अमरावती : बलात्काराच्या प्रकारणात गायब असलेला जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याला काल रात्री चांदूर रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने भोपालच्या एका लॉजमधून अटक केली आली आहे. हा बाबा गेल्यामहिन्या पासून फरार होता. त्याचा शोध अमरावती पोलीस घेत होते. अखेर त्याला सकाळी अमरावती येथे आणण्यात आले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील वर्षी गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर मागील महिन्यातच या बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुदासबाबाने मध्यप्रदेशातील एका महिलेवर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनवल्याचे तक्रारीत सांगितले होते. या घटनेची तक्रार दिल्यानंतर बाबा फरार झाला होता. ओळख लपण्यासाठी त्याने डोक्यावरील केस दाढी काढून टाकली होती तरी मात्र पोलिसांनी ओळखले. या लिंगपिसाट बाबाला चांदूर रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून अमरावती येथे आणण्यात आले आहे.
प्रकरण काय होते?…
पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील 34 वर्षीय महिला 2 मे 2023 रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती. पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल, असे बाबाने तिला सांगितले. त्यानंतर महिलेने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली. याचदरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे बाबाने महिलेला लग्नाचेही आमिष दाखवले होते.
कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी पीडित महिला आश्रमात राहत होती. या काळात गुरुदासबाबाने महिलेने अंगाऱ्यासारखा पदार्थ दिला. तो अंगारा खाल्ल्यावर पीडित महिलेला गुंगी आली. त्यानंतर गुरुदासबाबाने महिलेचे लैंगिक शोषण केले. यांनतर एक दिवस महिलेला त्याच्या मोबाइलमध्ये त्याने केलेल्या कुकर्माचा व्हिडीओ दिसला. तिने जाब विचारला असता, गुरुदासबाबाने दमदाटी करून धमकावले. त्यानंतर 2 जानेवारीला तिला नागपूरला सोडून बाबा फरार झाला. त्यानंतर महिलेने बाबाविरोधात गुन्हा दाखल केला.
काही महिन्यांपूर्वी याच भोंदू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने पसार झाला होता. यादरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला होता.