Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | गावठी दारु अड्ड्यावर फेजरपूरा पोलिसांची छापा...

अमरावती | गावठी दारु अड्ड्यावर फेजरपूरा पोलिसांची छापा…

अमरावती – शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पारधीबेडा भारतनगर वडाळी परीसरात तसेच पारधी बेडा राजूरा या दोन ठिकाणी फ्रेजरपुरा पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली असून या धाडीत एकूण 1,03,000 /- रुपयाचा प्रोव्हीशन माल व साहीत्य खालील प्रमाणे जप्त करण्यात आले आहे.

आयुक्त नविनचंद्र रेडडी सा. यांचे आदेश 01 व स. पो. आयुक्त फेजरपूरा विभाग अधिकारी व डि.बी.पथक चे कर्मचारी पो. दिनांक 04/04/2023 रोजी पो.स्टे. फेजरपुरा अमरावती शहर येथे अवैध दारुविकी करणारे लोकांवर कार्यवाही करणेबाबत मा. पोलीस प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ कंमाक अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.चे पोलीस स्टे. हददीत अवैध्यरित्या गावठी दारु विक्री करनारे लोकांनवर कार्यवाही करणे करीता पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळालेल्या माहीती वरुन पारधीबेडा भारतनगर वडाळी परीसरात तसेच पारधी बेडा राजूरा अमरावती येथे दारुबंदी कायद्या अन्वये रेड करुन एकून दोन ठिकानी रेड करुन 1,03,000 /- रुपयाचा प्रोव्हीशन माल व साहीत्य खालील प्रमाणे जप्त करण्यात आला आहे.

1) राजूरा पारधी बेडा येथे जावून पाहनी केली असता तेथे राहणारी मितोरी अनिल पवार वय 47 वर्ष रा.ग्राम राजुरा पारधीबेडा अमरावती हिचे राहते घरातुन एकून 14 ड्रम मोहाचा सळवा गावठी हातभटटी दारु गाळण्याकरीता उपयोगी येणारा किंमत अंदाजे 56,000/- रुपयाचा प्रोव्हीशन माल व साहीत्य जप्त करण्यात आला आहे. तिचे विरूध्द दारुबंदी अधिनियम चे कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

2) भारतनगर पारधीबेडा वडाळी अमरावती येथे जावुन पाहणी केली असता तेथे राहणारी साधना पहेलवान भोसले हिचे राहते घरी जावुन प्रो. रेड केला असता तिचे राहते घरी गावठी हा.भ.ची दारू गाळण्याकरीता लावलेली रनिंग भटटी व दारू गाळण्याकरीता साठवुन ठेवलेले मोहा माच सळव्याने भरलेल्या एकुण 09 ड्रम व गावठी हातभटटीची दारू गाळण्याकरीता उपयोगी येणारे साहीत्य असा एकुण 47,000/- रुपयाचा प्रोव्हीशन माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही व.पो.नि.गोरखनाथ जाधव, पो.उप.नि.गजानन राजमलू डि.बी.पथक प्रमूख जमादार योगेश श्रीवास,सुनिल सोळंके ना.पो.कॉ. श्रीकांत खडसे, हरीश चौधरी, महेन्द्र वलके, हरीश बुंदेले, रज्जाक शेकुवाले पो.कॉ.धनराज ठाकूर, सागर पंडीत, विनोद काटकर, महीला कर्मचारी पौर्णीमा कुंभलकर,शितल चौहाण, तसेच आर.सि.पी.पथक मधील कर्मचारी यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: