Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | पाण्याच्या टाकीत २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ...रत्नदीप कॉलनी...

अमरावती | पाण्याच्या टाकीत २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ…रत्नदीप कॉलनी संकुलातील घटना…

अमरावती : शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या अर्जुन नगरातील रत्नदीप कॉलनी संकुलात स्वतःच्या घराच्या पानाच्या टाकीत एका 28 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणीचे नाव अश्विनी गुणवंत खांडेकर वय वर्ष 28 असून ती गेल्या 25 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. तिची बेपत्ता असल्याची तक्रार हि गाडगे नगर पोलिसात दाखल होती.

शहरातील अर्जुन नगरच्या रत्नदीप कॉलनी संकुलातील राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणी अश्विनी गुणवंत खांडेकर या तरुणीचा मृतदेह आज सकाळच्या सुमारास घरच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस व एसीपी पूनम पाटील आणि घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची चौकशी करीत आहे. सोबतच डॉग स्कॉट आणि फिंगर प्रिंट तज्ञांनाही प्राचारण करण्यात आले आहे. सदर घटना घातपात की आत्महत्या याची पोलीस चौकशी करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: