अमरावती : शहरातील केवल कॉलनीत राहणारे मिलिंद वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मिलिंद वाघ यांची हत्या घरगुती वाद, पेन्शनची रक्कम बायकोच्या नावावर हस्तांतरित करण्याच्या वादातून झाली असल्याचं समोर आल आहे. माजी सैनिकाच्या बायको वर्षा हिने पती मिलिंद वाघ यांची हत्या करण्याचा कट रचला. तिच्या तीन मित्रांना आठ लाख रुपयांची सुपारी देण्याचे आमिष दाखवून तिने पतीची हत्या घडवून आणली. आता ती लोभी बायको तीन मित्रही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
न्यायालयाने चौघांनाही बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 20 एप्रिल रोजी वर्षा हिने गाडगे नगर पोलिस स्टेशन गाठून पती मिलिंद घरातून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. गाडगे नगर पोलीस मिलिंदच्या शोधासाठी टाळाटाळ करीत असल्याची वाघ कुटूंब सांगत आहे. या प्रकरणाचा गाडगे नगर येथील तपास अधिकारी आणि वाघ कुटुंबाशी वाद झाल्याची माहिती मिळत आहे, कारण मिलिंद यांची आठ दिवसांपासून कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिस तपास कामात हलगर्जी पणा करीत असल्याचं वाघ कुटुंबीयांचे म्हणणे होते. अशात नांदगाव पेठेतील गांधी कारडा मार्गावर असलेल्या नाल्यात एक मृतदेह आढळून आला.
नांदगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिकरित्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पत्नी वर्षा यांच्यासह कुटुंबीयांचे जबाब घेतले. त्यानंतर खुनाचे गूढ उकलले आणि वर्षा आणि मिलिंद यांच्यातील वाद असल्याचे समोर आले. कर्जामुळे मिलिंद घर विकणार होता. मात्र वर्षा घर विक्रीच्या रकमेच्या निम्म्या रकमेची मागणी करत होती. मिलिंदने याचा स्पष्ट इन्कार केला. याचा राग येऊन वर्षाने मिलिंदच्या मित्रांना आठ लाख रुपयांचे आमिष दाखवून खुनाचा कट रचला. शेजारी राहणारा मिलिंदचा मित्र शुभम भोयर, त्याचे मित्र संकेत आणि कार्तिक याने मिलिंदला दारू पाजण्यासाठी बोलावले. चौघेही कारडा मार्गावर गेले, तिथे तिघांनी मिलिंदची हत्या केली.
पैशाच्या लोभाने वर्षा हिने आठ लाख रुपयांची सुपारी देऊन स्वतःचे लग्न उद्ध्वस्त केले. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर मिलिंद रेल्वे विभागात गार्ड म्हणून कार्यरत होते. त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. असे असूनही त्याला त्याची मालमत्ता वर्षाला द्यायची नव्हती. वर्षालाही हे कळू लागले. त्यामुळे तिने पतीच्या हत्येचा कट रचला. 20 एप्रिलच्या रात्रीच तिघांनी मिलिंदची हत्या केली. दुसरीकडे मिलिंद बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन वर्षा यांनी गाडगे नगर पोलिस ठाणे गाठले होते. शेवटी वर्षाने पैशाच्या लोभापायी मिलिंद ला संपविल असनी स्वतः ही खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जाणार….