मानवी हक्क संदर्भातील प्रकरणावर होणार सुनावणी:नागरिकांने लाभ घेण्याचे आवाहन…
अमरावती – दुर्वास रोकडे
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सचिव हे शुक्रवार, दि. 26 ते 28 जुलै 2024 या कालावधीत अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी येत आहे. त्यांच्या दौरा कालावधीत मानवी हक्क आयोगातील प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
श्री. पाटील यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे : शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10.30 पासून विविध तक्रारींबाबत सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या तक्रारदारांना मानवी हक्कांच्या संदर्भात काही मुद्दे मांडायचे असतील तर सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात व संध्याकाळी 5 से 6 या वेळेत सर्किट हाऊस, विश्रामगृह, अमरावती येथे आपली तक्रार देऊ शकतात.
शनिवार दि. 27 जुलै 2024 रोजी अमरावती विद्यापीठात सकाळी 11 वाजता डॉ. श्रीकांत जिचकर मेमोरिअल रिसर्च सेंटर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे युवा रुरल असोसिएशन, नागपूर या स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने वीरपत्नी शेतकरी महिलांच्या प्रश्नांबाबत व त्यांच्या हक्कांबाबत चर्चासत्राचे आयोजन. ज्या संघटनांना या चर्चासत्रात सहभागी व्हायचे असेल ते या सत्रात सहभागी होऊ शकतील. रविवार दि. 28 जुलै 2024 रोजी विश्रामगृह अमरावती येथे काही तक्रारदारांना त्यांचे म्हणणे व तक्रार दाखल करावयाचे असल्यास त्यांनी दुपारी 1 ते 1.30 या दरम्यान राखीव ठेवण्यात आले आहे.
दौऱ्यादरम्यान मानवी हक्क आयोग विविध संस्थांना भेटी देणार आहे. तसेच आदिवासी भागामध्ये शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आधारकार्ड, रेशकार्ड व जातीचा दाखला या विषयांवरही जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली जाणार आहे. स्वयंसेवी संघटनांना याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा. शासनाच्या बऱ्याच योजनांचे लाभ हे आधारशी जोडले गेल्यामुळे व आधारकार्ड नसलेली बरीच प्रकरणे निदर्शनास येत आहे.
हा विषय प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्तही अमरावती जिल्ह्याचे काही महत्त्वाचे प्रश्न, मानवी हक्कांसंदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी मानवी हक्क आयोग तीन दिवस अमरावतीमध्ये उपलब्ध असून नागरिकांने त्याचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.