राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) निर्देशानुसार देशातील इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. आठ राज्यांमध्ये छापे मारताना 150 हून अधिक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे. ज्या राज्यांवर छापे टाकले जात आहेत त्यात दिल्ली, यूपी, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. तर राज्यातील संवेदनशील समजल्या जाणार्या अमरावती शहरातील PFI च्या जिल्हाध्यक्ष सोहेल अन्वर ला अटक केली आहे.
टेरर फंडिंगवर आळा घालण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणार्या पी एफ आय संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर धरपकड सुरू केली, यात PFI संघटनेचा अमरावती जिल्हा अध्यक्ष सोहेल अन्वर याला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली.
गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे चार वाजता नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सोहेल अन्वर याच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
अमरावती शहरात नुपूर शर्मा यांची पोस्ट शेअर केल्या प्रकरणात औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या झाली असताना या प्रकरणात , पी एफ आय संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करीत नागपुरी गेट पोलिसांनी सोहेला अन्वरला ताब्यात घेतले होते. त्यावेळी चौकशी करून त्याला सोडण्यात आले होते.