Sunday, January 5, 2025
Homeगुन्हेगारीअमरावती जिल्हयात ५६.५२ ग्रॅम एम. डी ड्रग्जसह दोन आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा...

अमरावती जिल्हयात ५६.५२ ग्रॅम एम. डी ड्रग्जसह दोन आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जि यांची संयुक्त कारवाई…

अमरावती ग्रामीण जिल्हयातील अंजनगाव सुर्ज तालुक्यातील अंजनगाव रोड वरील कारला बसस्थानकाजवळ दोन संशयित ईसम एमडी ( अंमली पदार्थ ) बाळगुण असल्याबाबतची गोपणीय खबर अंजनगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्यावरुन सदर खबरेबाबत ठाणेदार पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जि सह वरीष्ठांना कळविण्यात आल्यावरुन पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्ज येथील ठाणेदार श्री दिपक वानखडे यांचे नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करुन कारला बस स्थानकाजवळ मोटार सायकलवर असलेल्या दोन संशयित इसमांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्यांचे नाव गाव विचारले असता.

त्यांनी त्याचे नावे प्रणय ज्ञानेश्वर टाले वय २२ वर्ष, रा. अंतरी, ता. बाळापुर, जि. अकोला आणि प्रतिक गजानन भटकर वय २१ वर्ष, रा. जवळा, ता. शेगाव, जि. बुलढाणा असे सांगितले असता त्यांना मिळालेल्या गोपणीय माहीतीबाबत कळवुन त्यांची कायदेशीर रित्या झडती घेतली असता आरोपी प्रणय ज्ञानेश्वर टाले वय २२ वर्ष, रा. अंतरी, ता. बाळापुर, जि. अकोला याचे कडील बॅगमधील बनावट गुलाबाच्या कागदी पृष्ठाच्या आत दोन पारदर्शक प्लाटिक मध्ये पांढ-या रंगाचा एकुण ५६.५२ ग्रॅम किंमत २,८२,००० रु चा एमडी ( अंमली पदार्थ ) मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री उशीरापर्यंत एन.डी.पी.एस कायदयान्वये कायदेशीर कारवाई करुन अंमली पदार्थासह एकुण ४,०२, ३०० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ,

अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उप विभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव सुर्जि श्री सचिंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जि श्री दिपक वानखडे, पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री तपन कोल्हे सह पोउपनि नितीन चुलपार, पोलीस अंमलदार संतोष मंदाने, विजय शेवतकर, रविद्र बावणे, बळवंत दाभणे, अमोल देशमुख, सैयद अजमत निलेश डांगोरे, दिनेश कनोजिया, पंकज | फाटे, अमोल केंद्रे, राहुल चारथळ, विशाल थोरात, चालक गजानन नागे आणि राजेश सरकटे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: