अमरावती जिल्ह्यातील धारणी ते कुसुमको रोडवर दुचाकीने गांजाची तस्करी करण्याऱ्या दोघांना अटक केली आहे. धारणी पोलीस ठाणेदार व पोलीस स्टाफसह अवैधरित्या अंमलीपदार्थ गांजा कॅनबिज वनस्पतीची सुकलेली पाने व फुले विक्रीकरीता वाहून नेणारे 2 आरोपीतांना अटक करून त्यांचे कडुन एकुण 4.055 किलोग्रॅम अंमलीपदार्थ गांजा, व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण 1,42,990 /- रू. चा मुददेमाल जप्त केला.
दि. 27/07/2024 रोजी पो. नि. अशोक तु. जाधव ठाणेदार पोलीस स्टेशन धारणी यांनी गुप्त खबरेवरून धारणी ते कुसुमकोट बु. जाणा-या मुख्य डांबरी रस्त्यावरील मधुवा नाल्याजवळील भुतेष्वर मंदीराचे समोर मोटर सायकल चालकांना चेक करीत असता यातील आरोपी क. 1) संजय गोपाळराव इंगळे वय 52 वर्ष रा. इंदीरा नगर हिवरखेड जि. अकोला क. 2) शेख सलमान शेख ईसा वय 32 वर्ष रा. तिळके प्लॉट हिवरखेड जि. अकोला हे त्यांचे ताब्यातील मोटर सायकल क. MH-30-BT-2943 ने विना परवाना अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा, कॅनबिज वनस्पतीची वाळलेली पाने व फुले विक्री करण्याचे उददेषाने जवळ बाळगुन वाहतुक करतांना मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन 1 ) अंमली पदार्थ गांजा, कॅनबिज वनस्पतीचे वाळलेले फुले व पाने यांचे वजन केले असता 4.055 किलोग्रॅम किंमत प्रत्येकी 18,000/- रू. किलोग्रॅम प्रमाणे एकुण 72,990 /- रू. 2) गुन्हयात वापरलेली हॉन्डा शाईन एस. पी. 125 कंपनीची मोटर सायकल क. MH-30-BT-2943 किं. अं. 70,000/- रू. असा एकुण 1,42,990 /- रू. चा मुददेमाल पंचासमक्ष व मा. तहसिलदार साहेब यांचे समक्ष घटनास्थळ जप्ती पंचनाम्यातील पंचासमक्ष जप्त करण्यात आला. त्याबाबत आरोपी यांचे विरूध्द पो. स्टे. धारणी अपराध क. 483/ 2024 कलम 8 ( C ) 20 (B ) (ii) N.D.P.S. Act. प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासात सुरू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. विषाल आनंद साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अतुलकुमार नवगीरे साहेब उपविभागीय कार्यालय अचलपुर कार्यभार धारणी यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अषोक जाधव ठाणेदार पो. स्टे, धारणी, स.फौ. ईष्वर जांबेकर ब.नं. 971, पो.हे.कॉ. वसंत चव्हाण ब.नं. 606, पो.हे.कॉ. नितीन बौरसिया ब.नं. 1737, पो. कॉ. जगत तेलगोटे ब.नं. 2468, पो.कॉ. मोहीत आकाषे ब.नं. 49, पो.कॉ. रितेष देषमुख ब.नं. 183, पो. कॉ. सुहास डहाके ब.नं. 2291, पो.कॉ. क्रिष्णा जामुनकर ब.नं. 2470 यांनी केली असुन पुढील तपास पो. नि. अषोक तु जाधव ठाणेदार पोलीस स्टेषन धारणी हे करीत आहे.