अमरावती : चित्रपटात जसे कार आणि ट्रेनचे थरारक दृश दाखविले जातात त्याच प्रमाणे एक थरारक घटना धामणगाव रेल्वेच्या फलाट क्रमांक एक घडली आहे. रेल्वे platform शेजारी कॉर्टरमध्ये राहत असलेल्या एका कर्मचाऱ्याला स्वतःची कार टर्न करून बाहेर काढायची होती अशातच त्याचा क्लच ऐवजी एक्सीलेटर वर पाय पडल्याने क्वार्टर वरून निघालेली कार सरळपणे फलाट क्रमांक एक ओलांडून रुळापर्यंत चेंडू प्रमाणे उडली व मधातल्या रुळावर जाऊन फसली सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. शुक्रवारी या घटनेत कोलकत्ता मुंबई महामार्गावर मोठी दुर्घटना टळली
काल शुक्रवारी दुपारी २.५३ मिनिटाला धामणगावच्या रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली रेल्वे क्वार्टर वरून चालक गाडी क्रमांक एम.एच.४६ सी १३५४ बाहेर काढून टर्न करण्यासाठी म्हणून कार मध्ये बसला परंतु चालकाचा पाय क्लच ऐवजी एक्सीलेटर वर पडल्याने कार रेल्वे क्वार्टर वरून भरगाव वेगाने प्लॅटफॉर्म पार करून ५० ते ६० फूट दूर वर जावून रुळावर आदळली परंतु यावेळी कोलकत्ता मुंबई महामार्गावर कोणत्याही प्रकारच्या गाडी चे आवागमन नसल्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला
रुळावर उभे असलेल्या मालगाडीला सदर कार धडकली असती तर चालकाला सुद्धा मोठी हानी झाली असती परंतु सुदैवाने योगायोगाने मालगाडीच्या दोन ते तीन फुटावर सदर कार रुळावर आदळली त्यामुळे कारचा चालक सुदैवाने वाचला. आरपीएफ व स्टेशन अधीक्षक कुलकर्णी यांच्या समय सुचकतेने कारला अवघ्या दहा मिनिटाच्या आत रुळावरून उचलून घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे कर्मचारी किंवा आर.पी.एफ च्या जवानांनी उत्तम कामगिरी केली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती रेल्वे पोलीस तथा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे