Monday, December 23, 2024
Homeराज्यअमरावती | घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश...६ जण अटकेत...राज्यातील सर्वात मोठी...

अमरावती | घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश…६ जण अटकेत…राज्यातील सर्वात मोठी पोलीस कार्यवाही…

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट क्र. २ धडाकेबाज कारवाई करीत घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हेशाखा युनिट क्र. २ पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ देशी कट्ट्यासह १०२ चायना चाकू, खंजीर जप्त केले असून सोबत ६ तस्करांना अटक केली आहे. ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात अमरावती शहरामध्ये ख्रिसमस तसेच महाशिवपुराण सारखे धार्मीक कार्यक्रम असुन त्याचप्रमाणे नुतन वर्षा निमित्य शहरामध्ये सर्व धर्मीयांकडुन उत्सव साजरा केला जाणार आहे तसेच लोकसभा, विधानसभा व महानगर पालीका यांच्या निवडणुका आहेत. त्यादरम्यान अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच गुन्हेगार व गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा याकरीता मा. पोलीस आयुक्त साहेब यांनी क्राईम ब्रांच पथकांना विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषगांने मा. पोलीस आयुक्त श्री. नविनचंद्र रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शनात गुप्त माहीती काढुन अमरावती शहरात घातक शस्त्रे विक्री करणारी टोळीवर पाळत ठेवली.

दिनांक १० / १२ / २०२३ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. २ येथील पथकाला पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीती वरून शस्त्र विक्री करणा-या टोळी मधील सदस्य हा स्वतः जवळ चाकु सारखे खंजीर हातात घेवुन सार्वजनिक ठिकाणी येणा-या जाणा-या लोकांना दहशत माजवत आहे. अशा मिळालेल्या माहीती वरून आरोपी १. अब्दुल सोहेल अब्दुल शफी वय १९ वर्ष रा. गुलीस्ता नगर अमरावती, यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन १ घातक खंजर व २ घातक चायना चाकु शस्त्रे मिळुन आले. नमुद आरोपीस टोळी बाबत कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता. त्यांने टोळीतील प्रमुख व इतर साथीदार यांची नावे सांगितले. त्यानुसार टोळी प्रमुख, क्र. २. अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान वय १९ वर्ष रा. अलीम नगर, कब्रस्तान रोड अमरावती यास ताब्यात घेवुन इतर टोळीतील साथीदार क्र. ३. फरदीन खान युसुफ खान वय २१ वर्ष रा. राहुल नगर अमरावती, क्र. ४. मुजम्मील खान जफर खान वय २१ वर्ष रा.गुलीस्ता नगर अमरावती, क्र. ५. शेख सुफियान मोहम्मद अशफाक वय १९ वर्ष रा. यास्मीन नगर अमरावती, क्र. ६. जाहेद शहा हमीद शहा वय २० वर्ष रा. लालखडी, अमरावती असे सांगितले. वर नमुद घातक शस्त्रे विक्री करणारी टोळीतील ६ आरोपीतांकडे तपास केला असता सदर आरोपी हे मुंबई या ठिकाणा वरून शस्त्रांची मागणी करतात व अमरावती शहरातील गुन्हेगारांना सदर अवैध शस्त्रांचा पुरवठा करत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. सदर आरोपीतांकडुन सलग 48 तास सखोल तपास करून तसेच विविध ठिकाणी रेड करून तपासा दरम्यान त्यांच्या कडुन आज पर्यंत १०२ नग खंजर, चायना चाकु शस्त्रे व २ नग अग्नीशस्त्रे (देशी कड्डे) असा एकुण १,८५,५००/- रू चे शस्त्रे जप्त केली आहे. त्याबाबत पो.स्टे. नागपुरी गेट येथे अप.क्र. ६०२ / २०२३ कलम ३ / २५, ४ / २५, ७/२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे गुन्हा नोंद असुन कार्यवाही सुरू आहे.

सदर कार्यवाही मुळे अमरावती शहरात भविष्यात होणा-या खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा या सारख्या गंभीर गुन्हयांना प्रतिबंध करण्यात अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट क्र. २ यांना खुप मोठे यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील अवैध शस्त्रांविरोधीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही असल्याचा प्राथमीक अंदाज आहे. नमुद शस्त्र विकणा-या टोळी सदस्यांनी शहरातील बरेच शस्त्र बाळगणारे गुन्हेगांराची माहीती दिली असुन नमुद गुन्हयाच्या तपासात भरपुर शस्त्रे मिळण्याची दाट शक्यता दिसुन येत आहे त्यामुळे अमरावती शहरातील बरेच गुन्हेगार सदरच्या कार्यवाहीमुळे अमरावती शहरातुन बाहेर निघुन गेले आहेत. तसेच गुन्हेगारी टोळयांमधील व गंभीर गुन्हयातील आरोपीतांमध्ये सदर कार्यवाहीमुळे पोलीसांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजात खुप सकारात्मक संदेश गेला असुन समाजातील ब-याच सामान्य व्यक्तीनी तसेच प्रतिष्ठीत नागरीकांनी सदरची कार्यवाही पाहुन पोलीसांचे मोठया प्रमाणात कौतुक केले असुन समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री नविनचंद्र रेड्डी साहेब, मा. पोलीस उपायुक्त परीमंडळ – १ श्री. सागर पाटील साहेब, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शिवाजी बचाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि श्री. राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट क्र. २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, अनिकेत कासर, पोउपनि राजकिरण येवले, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, संजय वानखडे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी तसेच चालक संदिप खंडारे यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: