Sunday, December 22, 2024
Homeराजकीयअमरावती | आ.रोहित पवार व नितीन कदम यांच्यात समन्वयक चर्चा आली घडून...

अमरावती | आ.रोहित पवार व नितीन कदम यांच्यात समन्वयक चर्चा आली घडून…

बडनेरा विधानसभा मतदार संघाच्या विकासात्मक धोरणाचा दस्तऐवज केला सुपूर्द

कदम यांना पवारांनी दिल्या शुभेच्छा

रोहित पवारांनी दिला हिरवा कंदील

अमरावती – माध्यमामध्ये कालपर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरदचंद्रजी पवार यांच्या भेटीमुळे अमरावतीच्या राजकीय वातावरणात गोंधळ उळाला असतांना आज संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार, विधानसभा सदस्य रोहित पवार यांची भेट घेत बडनेरा विधानसभा मतदार संघाच्या विकासात्मक धोरणाचा दस्ताऐवज सुपूर्द केला.

दरम्यान सदर विस्तृत चर्चेमध्ये आधुनिकीकरण,अभिनवता हा कुठल्याही उद्योगाच्या व्यवसाय धोरणातील महत्त्वाचा घटक असून, त्याला चालना देण्यासाठी उद्योग व शिक्षण क्षेत्रात अधिक समन्वय व सहकार्य व बडनेरा शहर व ग्रामीण भागातील औद्योगिक , शैक्षणिक,रोजगारविषयक,आरोग्यविषयक बाबतीत गेल्या कित्येक वर्षापासून पिछाडीवर आहे याबतीत चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून महादेव कोळी समाजाच्या प्रलंबित असलेल्या चार मुख्य आणि वैध प्रमुख मांगण्यासंदर्भात कदम यांचेकडून भर देण्यात आला.यावेळी कदम यांचे सहकारी व महादेव कोळी समाजाचे संजय चुनकीकर सुद्धा याठिकाणी हजर होते.

यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या सामाजिक सेवाकार्य व वाढता जनसंपर्क बघता रोहित पवार यांनी उमेदवारीबाबत हिरवा कंदील दिला असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली.नितीन कदम यांनी काल शरदचंद्रजी पवार यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी आ. रोहित पवार यांच्या भेटीनंतर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला असून या राजकीय खेळीमुळे आणखी किती नवनवीन बाबी समोर येणार ..? हेही ओसुकत्याच ठरणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: