Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती । मध्यरात्री अपहरणकर्त्यानी 'त्या' मुलीला घरी आणून सोडले...अन अज्ञात हल्लेखोरांनी त्यास...

अमरावती । मध्यरात्री अपहरणकर्त्यानी ‘त्या’ मुलीला घरी आणून सोडले…अन अज्ञात हल्लेखोरांनी त्यास यमसदनी धाडले…चांदुर रेल्वे येथील घटना…

अमरावती जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. चांदुर रेल्वे शहरात चाकूच्या धाकावर घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली होती, पोलिसांनी त्या मुलीचा बराच शोध घेतला मात्र काल मध्यरात्री अचानक त्या मुलीला त्या अपहरणकर्त्याने आणून सोडले, आणि अज्ञात हल्लेखोरांनी त्याची निर्घृण हत्या केल्याने चांदूर रेल्वे शहर हादरले.

मिळालेल्या माहितीनुसार अपहरण प्रकरणी पीडित व आरोपीच्या शोधार्थ चांदूररेल्वे पोलिसांचे पथक ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आले होते तर गुरुवारी दुपारी चांदुर रेल्वे ठाण्यावर गावकर्यांनी मोर्चा काढत मुलीला परत आणून देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती गुरुवारी मध्यरात्री अपहरणकर्त्यानी त्या मुलीला घरी आणून सोडले मात्र त्याच परिसरात आरोपीचा अज्ञात हल्लखोरांकडून खून कऱण्यात आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे

पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार आरोपी नईम खान (वय 35), शेख अशफाक (वय 36), अतुल कुसराम (वय 36) व चांदूरवाडी येथील एक आरोपी असे चौघे विना नंबरच्या टवेरा गाडीतून पीडित मुलीच्या घरी आले होते. या ठिकाणी त्यांनी कुटूंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवीत मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात बसवून घेऊन गेले.

या घटनेमुळे सदर परिवार भयभीत झाला होता. त्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध भादंवी कलम 363, 452, 506, 34 तसेच शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात शोध सुरु असतांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण करणार्यांपैकी मुख्य आरोपी असलेल्या नईम खान याने त्या मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडले पण त्याच परिसरात अज्ञात हल्लखोरांकडून त्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आता हि हत्या नेमकी कोणी केली नईम खान ने त्या मुलीला कुठे नेले होते तो मध्यरात्री का आला असे अनेक प्रश्न पोलिसांपुढे आहेत पोलिसांनी ज्या ठिकाणी आरोपीचा खून झाला त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: