Friday, July 19, 2024
spot_img
HomeBreaking Newsअमरावती | चांदुर बाजार तहसीलदार गितांजली गरड ACB च्या जाळ्यात...

अमरावती | चांदुर बाजार तहसीलदार गितांजली गरड ACB च्या जाळ्यात…

अमरावती : अमरावती जिल्ह्यात महसूल विभागाचा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सुरु असून आधी अमरावती शहराचे तहसीलदार विजय लोखंडे यांना एका एका ले आउट प्रकरणात निलंबित केल्या नंतर आज चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड यांच्यासह खाजगी इसम किरण बेलसरे याच्या विरोधात अमरावती लाचलुचपतविरोधी पथकाने कारवाई केली असून चांदूर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याधीही पुण्यात नायब तहसीलदार असतांना कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण करत फसवणूक केल्याप्रकरणी गीतांजली नामदेवराव गरड यांना पोलिसांनी अटक केली होती.

थोडक्यात हकिकत यातील तक्रारदार यांनी दिनांक २८/०३/२०२४ रोजी तक्रार दिली की, त्यांचे वडीलांचे नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करणेबाबतचा आदेश काढून देणेकरीता श्री. किरण बेलसरे, लिपीक, तहसिल कार्यालय, चांदूर बाजार, जि. अमरावती यांनी स्वतः करीता व तहसिलदार श्रीमती गरड यांचेकरीता २५,०००/- रुपये लाचेची मागणी करीत आहेत.

सदर तक्रारीवरुन दिनांक २८/०३/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दम्यान श्री. किरण बेलसरे यांनी तडजोडीअंती २०,००० /- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक ०८/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान श्रीमती गितांजली गरड, तहसिलदार, चांदूर बाजार, जि. अमरावती यांचे श्री. किरण बेलसरे, खाजगी इसम यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरुन नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन चांदूर बाजार, अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे….

सदरची कार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, श्री. अनिल पवार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलींदकुमार बहाकर, पोलीस उपअधिक्षक, श्री. मंगेश मोहोड, पोलीस उप अधीक्षक, श्रीमती विजया पंधरे, पो. नि. श्रीमती चित्रा मेसरे, पो.नि.पो. हवा प्रमोद रायपुरे, ना.पो.कॉ. युवराज राठोड, नितेश राठोड, महेंद्र साखरे, पो. कॉ. उमेश भोपते,वैभव जायले, ला.प्र.वि. अमरावती, चालक सपोउनि बारबुध्दे, किटकूले यांनी पार पाडली. नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधीतकार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन
करण्यात येत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: