Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | IGP चंद्रकिशोर मीना व आयुक्त डॉ आरती सिंग यांची मुंबईत...

अमरावती | IGP चंद्रकिशोर मीना व आयुक्त डॉ आरती सिंग यांची मुंबईत बदली…जयंत नाईकनवरे नवीन IGP…नवे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी

अमरावती – आयपीएस अधिकाऱ्यांची बदली यादी मंगळवारी संध्याकाळी गृह मंत्रालयाने जाहीर केली. या १५ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची मुंबईतील सशस्त्र पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आज 12 वाजताच्या सुमारास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांचीही मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृह्मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

चंद्रकिशोर मीना यांच्या ठिकाणी नाशिक येथून पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नियुक्ती केली आहे. अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूर पोलीस आयुक्तालयात अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आयपीएस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी अमरावती पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

नवे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे दबंग आणि आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामुळे अमरावती शहरातील गुन्हेगारी किती प्रमाणात कमी होईल? मुंबई आणि सध्या नागपुरात त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. त्यामुळे त्यांचे उत्कृष्ट कार्य अमरावती शहरातही होणार असल्याची अनेकांना अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: