अमरावती – शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर,२०२३ रोजी मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १४ वडाळी येथे दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील चिमुकले राधा कृष्णाच्या वेशभूषेमध्ये आले. यावेळी भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. राधा कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी सुंदर नृत्य ही सादर केले.
सर्व मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गोपाळकाला उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला याचा आनंद शाळेतील सर्व मुलांना नाचून गाऊन आनंद लुटत मनोरंजन केले. याप्रसंगी शाळेतील मुले व मुली पांरपारिक पोशाखात परिधान करून त्यांनाही आनंद लुटला.
‘हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर… अशा उत्साहाच्या वातावरणात शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पथकाने दोन थर लावत दहीहंडी फोडताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा लव्हाळे तसेच शाळेतील शिक्षक वर्ग, अनिता विधाते, प्रणिता देशमुख, सुलोचना डाखोळे, योगेश पखाले, स्मिता वानखडे, ज्योती अस्वार, ज्योत्स्ना गवई, चेतना बोंडे, मनीषा वाकोडे, अनुप भारंबे, वैशाली देशमुख, विशेष शिक्षिका सोनिया पवार, योगेश गजभिये,
राजश्री सोळंके, प्राजक्ता चौधरी यांनी परिश्रम घेतले. KG, नर्सरी च्या शिक्षिका अर्चना राऊत, प्रगती अळसपुरे, प्रियांशु इंगोले यांनी सुंदर दहीहंडी सजावट केली. या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक उपस्थित होते. सर्वात शेवटी मुलांना गोपाळकाला व लाडू वितरित करण्यात आले.