Saturday, November 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांना अटक...घरफोडीचे ३ गुन्हे उघड...

अमरावती | घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांना अटक…घरफोडीचे ३ गुन्हे उघड…

अमरावती : जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळवेल गावातील घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांना अमरावती (ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने अटक केली आहे. १)देनरुपा अजमास पवार वय १९ वर्ष, २) कुटरु अजमास पवार वय २० वर्ष, दोन्ही रा. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती असे आरोपींचे नाव असून इतर तिन आरोपी फरार आहेत.

दिनांक २०/०२/२०२३ रोजी रात्री दरम्यान पो स्टे आसेगाव हददीतील ग्राम राजनापुर्णा व धानोरापुर्णा गावात काही अज्ञात चोरांनी प्रवेश करुन गावातील नागरीक झोपी गेले असता एका पाठोपाठ ०७ घरात प्रवेश करुन कुलूपकोंडे तोडुन ज्या खोलीत घरातील लोक झोपले त्याचे दरवाजे बाहेरुन बंद करुन सोन्या चांदीचे दागिन, एक मोटर सायकल व नगदी असे एकुण २,४७,६०० रुपयाचा मुददेमाल चोरुन नेला होता.

यावरुन पो स्टे आसेगाव येथे गु.र.नं. ६१ / २३ व ६२ / २३ कलम ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच दिनांक १६/०२ / २०२३ रोजी रात्री दरम्यान सुध्दा काही अज्ञात चोरांनी पो स्टे चांदुरबाजार हददीतील ग्राम तळवेल गावातील दोन घरात कुलूप कोंडा तोडुन सोन्याचे दागिने व नगदी रुपये चोरुन नेले होते. या घटनेवरुन स्टे चांदुरबाजार येथे गु. रं.न. १३३/२३ कलम ४५७, ३८० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यापुर्वीच्या अश्याच चोरींच्या घटनाचे अवलोकन केले असता एक विशेष टोळी सदर प्रकारच्या गुन्हे करण्यात सराईत असुन सदर टोळी जिल्हात सक्रिय आहे किंवा कसे याबाबत शहानिशह करुन सदर गुन्हे लवकरात लवकर उघडकिस आणण्याबाबत मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा यांना सदर गुन्हाचा समांतर तपास करण्याबाबत आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने दिनांक २४/०२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर घरफोडी करणा-या चोरांबाबत माहीती घेत असता गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, परतवाडा अमरावती रोड वरील फतिमा शाळा परतावाडा समोर झोपडया लावुन राहत असलेल्या देनरुपा अजमास पवार व कुटरु अजमास पवार यांनी त्यांचे साथीदारासोबत मिळुन सदरच्या चोरीच्या घटना केल्या असुन ते सर्व लोक चोरीचे दुसरे दिवशी दिनांक २१/०२/२०२३ रोजी सकाळीच अंजनगाव सुर्जी येथे गेले आहेत.

प्राप्त गुप्त बातमीचे आधारे पथकाने आठवडी बाजार अंजनगाव सुर्जी येथे जावुन सापळा रचुन तेथे राहत असलेल्या देनरुपा पवार व कुटरु पवार यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन घडलेल्या चोरींच्या घटनेबाबत कसोशीने विचारपुस केली असता आरोपीतांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी सदर गुन्हे त्यांचे ०३ साथीदार यांचे सह केले असल्याचे कबुल केले. वर नमुद आरोपीतांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांचे गुन्हयात सामिल असलेले इतर ०३ साथीदार पसार झाले.

आरोपी यांचे ताब्यातुन चांदीने दागिने, चो-या करण्यासाठी वापरण्यात आलेली बजाज पल्सर कंपणीची मोटर सायकल, दोन स्मार्ट मोबाईल फोन, असा एकुण ८०५०० रुपयाचा माल जप्त करण्यता आला. आरोपींना पुढील कार्यवाही करीता पो स्टे आसेगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पसार आरोपींचा शोध सुरु आहे. सदर गुन्हे करणारे आरोपी हे मुळ कर्नाटक – महाराष्ट्र सिमेवरील भागात राहणारे असुन त्यांनी अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी व राज्यातील इतर ठिकाणचे पत्ते देवुन आधारकार्ड तयार केले आहेत.

सदर गुन्हे उघडकिस आणने करीता गुप्त बातमीदार व पो स्टे सायबर नी महत्वाची भुमिका पार पाडली आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री. तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात स. पो. नि. रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, मोहम्मद तस्लीम शेख,पोलिस अंमलदार,दिपक उईके संतोष मुंदाने, युवराज मानमोठे, पंकज फाटे, बळवंत दाबने, रविद्र बावने, स्वप्नील तंवर, रविंद्र व- हाडे,सचिन म्हसांगे,मंगेश लकडे, पुरुषोत्तम यादव, चंद्रशेखर खंडारे, दिनेश कनोजिया, सागर नाठे, चालक संदिप नेहारे, कमलेश पाचपौर व पो स्टे सायबर यांचे पथकाने केली आहे.
पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण करिता पोलीस

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: