अमरावती शहरातील प्रभात टॉकीज जवळील असलेली जीर्ण झालेली दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची शिंदे-फडणवीस सरकार दाखल घेत मृत्युमुखी झालेल्या त्या पाचही भुतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निर्णय घेतला असून याबाबत अधिकृत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून दिली.
अमरावती येथे एक जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जखमी आहेत. मलबा हटविण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्हाधिकार्यांशी मी संपर्कात आहे. या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. या घटनेत प्राण गमवावे लागलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे.
अमरावती शहरातील प्रभात टॉकीज चौकातील राजेंद्र लॉजची जुनी इमारत आज १ वाजताच्या सुमारास कोसळली यात पाच मजुरांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले होते, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटद्वारे माहिती दिली.