Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यAmravati Breaking | क्रिकेट टीम घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हलरचा मोठा अपघात…चोघांचा मृत्यू…१०...

Amravati Breaking | क्रिकेट टीम घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हलरचा मोठा अपघात…चोघांचा मृत्यू…१० जण गंभीर…

अमरावती : क्रिकेट खेळण्यासाठी टीम घेऊन जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर मोठा अपघात झाला असून या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव खंडेश्वर रोडवरील शिंगणापूर जवळील आज सकाळच्या सुमारास घडलेली घटना. जखमींना प्राथमिक उपचारासाठी नांदगांव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे, तर काहींना अमरावती येथे रेफर केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अमरावती वरून यवतमाळ येथे क्रिकेट सामना खेळण्यासाठी 14 जणांची टीम घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हलर व सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन टँकर यांच्यात अमोरासमोर भिडत झाली असून या मध्ये ट्रॅव्हलर मध्ये असलेल्या 14 पैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेला माहितीनुसार मृतकांची नावे
श्रीहरी राऊत, आयुष बहाले, सुयश अंबरते, संदेश पाडर असे मृत झालेल्यांची नावे असून सर्व अमरावती येथील रहिवासी असल्याचे समजते.

नांदगाव खंडेश्वर येथे जखमींवर उपचार सुरू …तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी केले रेफर…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: