Monday, December 23, 2024
Homeराजकीयअमरावती | आमदार रवी राणांनी लावलेल्या फलकाला भाजपचे तुषार भारतीय यांनी काळ...

अमरावती | आमदार रवी राणांनी लावलेल्या फलकाला भाजपचे तुषार भारतीय यांनी काळ फासले…

अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपच आता मैदानात उतरली असून भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी आज साई नगरात लावलेल्या विकास कामाच्या फलकाला काळ फासले असून येत्या दिवसात अमरावती शहराचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रभागातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते तुषार भारतीय करीत आहे.

तुषार भारतीय यांनी आज सकाळी प्रभाग क्र 19 साईनगर येथील सातोर्णा सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यासह जावून काळ फासलं. आमदार रवी राणांनी नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले. त्यांना दहा दिवसापूर्वीच अल्टीमीटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही पण त्यांनी काढले नाही त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका त्यांनी काढले नाही

आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळ फासल आहे असे तुषार भारतीय म्हणाले. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुधार नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठलेही नगरसेवक आदर्श कदापि सहन करणार नाही…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: