Sunday, November 17, 2024
Homeराज्यअमरावती | भाजपा नगरसेविकेचे हिऱ्याच्या अंगठीसह मौल्यवान दागिने गेले होते चोरीला...पोलिसांनी...

अमरावती | भाजपा नगरसेविकेचे हिऱ्याच्या अंगठीसह मौल्यवान दागिने गेले होते चोरीला…पोलिसांनी लावला शोध…

अमरावती : शहरातील पोलीस ठाणे गाडगेनगर हद्दीत भाजपा माजी नगरसेविका श्रीमती सुरेखाताई दिगाबर लुंगारे, रा. कांतानगर, अमरावती यांच्या पर्स मधील हिऱ्याच्या अंगठीसह मौल्यवान दागिने चोरीला गेले होते. तर अमरावती गाडगे नगर पोलिसांनी चोरट्यास जेरबंद करून चोरी केलेले सर्व समान हस्तगत केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती सुरेखाताई दिगाबर लुंगारे हया त्यांची बहिण श्रीमती पद्मा महल्ले यांचेसह घरी गेले असतांना दिनांक ११.१०.२०२३ रोजी दुपारी ०१.३० वा चे दरम्यान त्यांचे पर्समधील सोन्याची ३.५० ग्रॅम अंगठी, २३ ग्रॅम वजनाचा सोन्याची चैन, तसेच ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली एक हिऱ्याची अंगठी व ०१ ते २.५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, तसेच ४०००/-रु रोख रक्कम असे एकुण मुद्देमाल २,४३,०००/- रु ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दिली असता त्यावरुन पोलीस ठाणे गाडगेनगर येथे अप क्रं. १२५५/२०२३ कलम ३८१ भादंवि अन्वये दिनांक १२.१०.२०२३ रोजी दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास तांत्रिक व शास्त्रोक्त पध्दतीने करुन फिर्यादीचे घरी येणारे जाणारे यांचेबाबत सखोल चौकशी करुन संशयीत असलेली घरकाम करणारी महिला संध्या चापळकर हिचे बाबत गोपनियरित्या बातमीदारांकरवी माहिती संकलित केली, तसेच तिच्या संपर्कात असणारे यांचेविषयी माहिती घेवून गोपनिय चौकशी केली व खात्री पटल्यानंतर सदर संशयीत महिला संध्या विजय चापळकर वय ४० वर्ष, रा.वडरपुरा, अमरावती हिला दिनांक १४.११.२०२३ रोजी अटक केली.

या गुन्हयात तिला चोरी केलेले मौल्यवान दागीने विक्री करण्यास मदत करणारा अनिस अहमद गुलाम गिलानी, वय ४२ वर्ष, रा. मुस्तफा नगर, हैदरपुरा अमरावती यास सुध्दा ताब्यात घेण्यात येवून त्यांचेकडुन चोरीस गेलेला एकुण २,४३,०००/- (अक्षरी दोन लक्ष त्रेचाळीस हजार रुपये) रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर मुद्देमालापैकी चोरीस गेलेली मौल्यवान हिऱ्याची अंगठी ही जशीच्या तशी हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. सदर संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस आयुक्त श्री नविनचंद्रजी रेड्डी (भापोसे.), मा. श्री सागर पाटील,पोलीस उपायुक्त परिमंडळ-०१, श्री कैलास पुंडकर, सहायक पोलीस आयुक्त गाडगेनगर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री गजानन गुल्हाने, व.पो.नि.पोलीस ठाणे गाडगेनगर याचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश राऊत,

पोहवा सुभाष पाटील- १२८०, पोहवा.आस्तिक देशमुख बनं. २०९, पोना. गजानन बरडे बनं. ९८०, पोकॉ. सुशांत प्रधान बनं. १८११, पोकॉ.प्रशांत वानखडे बनं.१६१५, पोकॉ.सागर धरमकर बनं. १७७, पोकॉ. जयसेन वानखडे बनं. १७३३, चालक पोहवा जाकिर खान बनं. ३८० यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: