Monday, December 23, 2024
Homeराजकीयअमरावती | आमदार रवी राणा विरुद्ध बच्चू कडू आक्रमक...दिला 'हा' इशारा...

अमरावती | आमदार रवी राणा विरुद्ध बच्चू कडू आक्रमक…दिला ‘हा’ इशारा…

अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध रवी राणा यांच्यात चांगलाच वाद पेटला असून आमदार बच्चू कडू यांनी फडणवीस समर्थक आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध काल राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला चढवत म्हणाले, रवी राणा यांनी सिद्ध करावे मी एक तारखेपर्यंत वाट बघतो, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा मी या संदर्भात नोटीस देणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे कारण पैसे कोणी दिले हे त्यांनी सिद्ध करावे

बच्चू कडू यांनी गुवाहाटी जाऊन करोड रुपये घेतले व आंदोलनात बच्चू कडू हे तोडपाणी करून सेटलमेंट करतात असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू वर केला होता त्यामुळे आज अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांनी आपल्या समर्थक असावा आमदार रवी राणा विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा विरुद्ध जोरदार टीका केली, रवी राणा यांनी माझी बदमामी केली, गुवाहाटीला जाऊन पैसे घेतले हे रवी राणा यांनी सिद्ध करावे मी एक तारखेपर्यंत वाट बघतो.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा मी या संदर्भात नोटीस देणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे कारण पैसे कोणी दिले हे त्यांनी सिद्ध करावे तसेच मी गुवाहाटी ला गेलो म्हणून रवी राणा मंत्रीपदाच्या रांगेत आहे असही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: