अमरावती गुन्हे शहर शाखेच्या टीमने मोठी कामगिरी करीत शहरातील ११ दुचाकी वाहनासह २ प्रवासी ऑटो चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पकडले असून या चोरट्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. त्यांच्या कडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आणखीन मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. आहे.
आज दिनांक 15.11.2022 रोजी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहितीमिळाली की, दोन इसम चित्रा चौकात एक चोरी मोटर सायकल घेऊन येत आहे. वरुन सापळारचला असता आरोपी नामे १) मोहम्मद अबुजर अब्दुल कलीम, वय १९, रा. बिस्मील्ला नगर अमरावती २) अब्दुल तहेसीम अब्दुल फईम, वय १९, रा. बिस्मीला नगर, अमरावती याचे ताब्यातून पोलीस स्टेशनसिटी कोतवाली अप.क्र. 352/2022 कलम 379 भादंवि चे गुन्हयातील चोरीस गेलेली हिरो होंडास्प्लेंडर मोटर सायकल मिळून आली.
सदर आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व त्यांनाशहरातील चोरीच्या वाहना बाबत विचारपुस केली असता त्यांनी आणखी वाहने अमरावती शहर व नागपुर शहर येथून चोरीस केल्याचे कबुली दिली वरुन त्यांचे ताब्यातून एकुण 11 मोटर सायकलीहिरो होंडा स्प्लेडर एकुण किंमत 5,50,000/-व दोन प्रवासी ऑटो किंमत 8,00,000/- रु. चाअसा एकुण 13,00,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वर नमुद आरोपींचा एक साथीदार फरार असल्याने आरोपी अटक बाकी असून त्याच्या ताब्यातून ‘आणखी मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, अमरावती डॉ. आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक श्री अर्जुन ठोसरे गुन्हे शाखा अमरावती शहर यांचे नेतृत्वात गुन्हे शाखा येथीलसहा. पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोहेकॉ जावेद अहेमद, पोहेकॉ अजय मिश्रा, नापोकॉ दिपकसुंदरकर, निलेश पाटील, इजाज शहा, चापोहेकॉ गजानन लुटे यांनी केली आहे.18th 21पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, अमरावती शहर.