अमरावती ग्रामिण जिल्हयात साजरे होणारे सण व उत्सवांचे कालावधीत शांतता व सुव्यवस्था अवाधीत राहण्याचे दृष्टीने सक्रिय गुन्हेगांरावर कठोर व परिणामकारक प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी अधिनस्थ सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे.
पो.स्टे. तळेगांव हद्दीतील देवगांव चौक येथील हॉटेल व बार सदानंद चा मालक नामे अमोल बबनराव इंगळकर रा. देवगांव, ता. धामणगांव, जि. अमरावती याचे विरूध्द पो.स्टे. तळेगांव येथे शरिरा विरूध्दचे तसेच दारूबंदी कायद्यान्वये एकुण ०७ गुन्हे नोंद असुन त्याचेवर वेळो-वेळी प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा करण्यात आली होती.
परंतु सदर इसम याचे वर्तणुकी सुधारणा झाली नाही. सदर इसमाचा देवगांव येथे हॉटेल व बार असुन त्याचे बार मधील नौकर व इतर साथीदार यांच्या मदतीने त्याने अनेक वेळा लोकांशी भांडणे करून मारहाण सुध्दा केली असल्याचे निर्दशनास आले आहे परंतु त्याचे भिती मुळे सर्वसामान्य लोक त्याचे विरूध्द पोलीसात तक्रार देण्यास घाबरतात असे प्राथमीक चौकशीत निष्पन्न झाले होते.
करिता सदर इसमावर पोलीसांचा अंकुश प्रस्तापीत करून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखता यावी या करिता श्री. रामेश्वर धोंडगे, ठाणेदार, पो.स्टे. तळेगांव यांनी त्याचे विरूध्द कलम ५६ (१) (ब) मु.पो.का. प्रमाणे हद्दपार प्रस्ताव तयार करून मा. श्री. सचिन्द्र शिंदे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे मान्यतने उप-विभागीय अधिकारी (महसुल), चांदुर रेल्वे यांचे समक्ष हद्दपार आदेश पारीत करण्या करिता सादर करण्यात आला होता.
श्री. रविंद्र जोगी, उप-विभागीय अधिकारी (महसुल), चांदुर रेल्वे यांचे न्यायालयात सदर प्रकरण चालविण्यात आले असता पोलीसांनी सादर केलेला प्रस्तावान्वये नमुद इसमास कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे दृष्टीने अमरावती जिल्हयातुन तसेच नजिकचे परिसरातुन सुध्दा हद्दपार करणे आवश्यक असल्याचा सिध्द झाल्याने श्री.रविंद्र जोगी,
उप-विभागीय अधिकारी (महसुल), चांदुर रेल्वे यांचे आदेशान्वये नमुद इसम नामे अमोल बबनराव इंगळकर, रा.देवगांव,ता.धामणगांव, जि. अमरावती (सदानंद बार व हॉटेलचा मालक) यास ०३ महीन्या करिता अमरावती जिल्हयातुन तसेच नजीकच्या वर्धा जिल्हयातील पुलगांव तालुका व यवतमाळ जिल्हयातील बाबुळगांव तालुक्यातुन हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले आहे.
नजीकचे काळात अश्याप्रकारचे गुन्हे करणारे व समाजात दहशत पसरविणारे इसमां विरूध्द सुध्दा तडीपार करण्याची कार्यवाही करण्यात येत असुन नजीकचे काळात आणखी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसमांवर अश्याप्रकारचे आदेश निघण्याची शक्यता असल्याचे पोलीसांनी कळविले आहे.