अमरावती-अकोला : काल देशात विविध सर्व्हे संस्थांनी एक्झीट पोल सर्व्हे सादर केला यामधे NDA म्हणजेच भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असे सर्वच सर्व्हे संस्थांनी अंदाज लावला यामधे चाणक्य तर देशात भाजपा ४०० जागा मिळणार तर राज्यातही भाजपला ३३ जागा मिळणार असल्याचे दाखवून दिले. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यामध्ये अकोला मतदार संघातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी होतील असा अंदाज दिल्या गेला तर अमरावती मध्ये भाजपच्या नवनीत राणा विजयी होणार असल्याने मतदारांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा यांच्या बद्दल अमरावतीकरांची कोणतेही सहानुभूतीची भावना नसून यावेळी राणा यांच्या विरोधात मतदान झाल्याचं प्राथमिक अंदाज होता. मात्र कालच्या आलेल्या एक्झीट पोलच्या सर्व्हे मध्ये नवणीत राणा आघाडीवर असल्यानं पुन्हा एकदा लोकांनी EVM मॅनेज केले का? असा प्रश्न उपस्थित करीत आहे. विशेष म्हणजे यावेळी बळवंत वानखेडे निवडून येण्यासाठी भाजपच्या काही गटातून वानखडे यांना मतदान झाल्याचे समजते तर अमरावती जिल्ह्यातील १० लोकांना विचारणा केल्यास, कोण निवडून येणार? तर १० पैकी ९ लोक वानखेडे यांना पसंती देतात. मात्र कालच्या एक्झीट पोलच्या सर्व्हेची जी आकडेवारी बाहेर आल्याने पुन्हा एकदा EVM वर लोकांनी बोट ठेवलं.
कालच्या एक्झीट पोल मुळे भाजप कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वतःची समजूत काढत आहे. निकाल येत्या ४ तारखेला असल्याने त्यांच सर्व लक्ष निकालांकडे लागले आहे.
देशातील विविध एजेंसीने राज्यांतील केलेल्या सर्व्हेची आकडेवारी…