Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | कोंडेश्वर चौकात युवक-युवतीचा भीषण अपघातात मृत्यू...पाहा Video

अमरावती | कोंडेश्वर चौकात युवक-युवतीचा भीषण अपघातात मृत्यू…पाहा Video

अमरावती : कॉलेजचा बहाना करीत घरून गेलेल्या युवक-युवतीचा अमरावती-नागपूर सुपर एक्सप्रेस हायवे वरिल कोंडेश्वर चौकात कार आणि ट्रेलर मध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली असून आदित्य अखिलेंद्र विश्वकर्मा (18) आणि गौरी शेळके अशी मृतांची नावे आहेत. दोघेही कारमधून बाहेर फिरण्यासाठी निघाले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, ट्रकला ओव्हरटेक कार उभ्या असलेल्या वाहनाला धडकली, कारमधील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू. अपघाताची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी इर्विन-हॉस्पिटल गाठले असून येथे गौरीच्या संतप्त नातेवाईकांनी इर्विनमधील विश्वकर्मा कुटुंबावर हल्ला केला आणि आदित्यच्या मृतदेहावर लाथ मारल्याचा आरोप आहे. विश्वकर्मा कुटुंबाने कोतवाली पोलिस स्टेशन गाठले असल्याचे माहिती मिळाली…

ADS
Video – सौजन्य सोशल मिडिया
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: