Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | तारेने भरलेला ट्रक १५ फूट उंच असलेल्या समृध्दी महामार्गावरून थेट...

अमरावती | तारेने भरलेला ट्रक १५ फूट उंच असलेल्या समृध्दी महामार्गावरून थेट जमिनीवर कोसळला…चालकाचा जागीच मृत्यू…

अमरावती : समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका थांबायचं नावच घेत नसून सकाळी ६ वाजता दरम्यान शेंदुरजना खुर्द नजिक ट्रकला भीषण अपघात झाला आहे. तारेने भरलेला ट्रक १५ फूट उंच असलेल्या समृध्दी महामार्गावरून थेट जमिनीवर कोसळला आहे. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर वाहक गंभीर जखमी झाला आहे. दोघांना धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

तारेने भरून GJ 16AV 1714 क्रमांकाचा ट्रक नागपूर वरून मुंबई कडे जात असताना सकाळी 6 वाजता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेदुरजना खुर्द दरम्यान चालक आशिष तिवारी (21) याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला आहे. यात चालक आशिष तिवारी याचा दबून जागीच मृत्यू झाला आहे तर वाहक संतोष केवट (28)हा गंभीर जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: