Wednesday, December 25, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती । भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक...अचलपूर येथील तीन युवक ठार...

अमरावती । भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक…अचलपूर येथील तीन युवक ठार…

अमरावती :- मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यातील देडपाणीनजीक कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील तीन युवक ठार झाले. धडक एवढी जोरदार होती की एकाच दुचाकीवरील तिन्ही युवक लांब फेकल्या गेलेत.

राज नागापुरे (वय २३ वर्ष), अंकुश पारस्कर (वय ३२)वर्ष व अमित ठाकूर (वय३२ वर्ष) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र दुचाकीने चिखलदरा तालुक्यातील घटांग मार्गे काटकुंभकडे जात असताना कारने माखला मार्गावर देढपाणीजवळ त्यांना जोरदार धडक दिली.

हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील तिन्ही युवक दूरपर्यंत रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. व यात तिघांचा मृत्यू झाला, कार चालक मात्र घटनास्थळ वरून अपघात करून फरार झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: