Sunday, December 8, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्या गुंडाने परिवारातील ६ जणांना कारने चिरडले...तीन...

अमरावती | दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्या गुंडाने परिवारातील ६ जणांना कारने चिरडले…तीन ठार व तीन जखमी…

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना खुर्माबाद गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गावातील चंदन गुजर नावाच्या ३८ वर्षीय क्रूर व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या परिवारावर प्राणघातक हल्ला करून तिघांना ठार व तिघांना गंभीर जखमी केले आहे. काल रात्री ८:३० वाजताच्या दरम्यात हे घटना घडली असून मृतांमध्ये अनुसया अंभोरे (६७), शामराव अंभोरे (७०) आणि अनारकली गुजर (५५) यांची क्रूर हत्या केली. तर जखमींना उपचारासाठी अमरावती येथे आणण्यात आले असून त्यांचावर सध्या उपचार सुरु आहे. या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोना खुर्माबाद येथे गावात राहणाऱ्या गावगुंड व दारूचा अवैध व्यवसाय करणारा चंदन गुजर या क्रूर व्यक्तीने रागाच्या भरात शेजारी राहणाऱ्या अंभोरे कुटुंबीय आपल्या घराच्या अंगात गप्पा करत बसले होते. त्यावेळी संशंयित आरोपीने गप्पा करत बसलेल्या अंभोरे कुटुंबियांना चिरडलं. पूर्व वैमनस्यातून त्याने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. सदर हत्याकांड कोंबडीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले, शारदा अंभोरे (३८) उमेश अंभोरे (४०) किसन अंभोरे (३८) जखमींवर इर्विन येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, आरोपी चंदन घटनेपासून फरार आहे, खळबळजनक घटनेची माहिती मिळताच प्राप्त, दर्यापूर व्यतिरिक्त खल्लार पोलीस, एलसीबी टीम आणि एटीआय. पोलीस अधीक्षक विक्रम साळी घटनास्थळी पोहोचले, आरोपीचा शोध जोमाने सुरू आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: