Sunday, December 22, 2024
Homeराज्यअमरावती | बनावट कागदपत्राच्या आधारे चोरी केलेल्या मोटार सायकल विक्री करणारी टोळी...

अमरावती | बनावट कागदपत्राच्या आधारे चोरी केलेल्या मोटार सायकल विक्री करणारी टोळी जेरबंद…स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची कारवाई…

अमरावती : चोरी केलेल्या मोटरसायकली बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करणारी टोळी अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलय. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ११ मोटारसायकली अंदाचे किंमत १०,०५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामिण श्री. अविनाश बारगळ यांनी अमरावती ग्रामिण हद्दीतील वाढत्या मोटार सायकल चोरीच्या आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि मोहम्मद तस्लीम शेख गफुर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते.

आज दिनांक ०२ /१०/२०२३ रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार हे चांदुर रेल्वे उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, चेतन चव्हाण रा. सोनोरा भिलटेक ता. चांदुर रेल्वे व त्याचे सोबत एक इसम हे विनाकागदपत्रे असलेली बुलेट दुचाकी कमी किमतीमध्ये विक्री करीता धामणगाव रेल्वे येथे फिरत आहे. अशा माहितीवरुन धामणगाव रेल्वे येथून गोपनिय खबरेप्रमाणे १) चेतन नरेंद्र चव्हाण वय २२ वर्ष, रा. सोनोरा भिलटेक ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती २) अनिकेत बागळे वय रा. चांदुर रेल्वे ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती यांना त्यांचे ताब्यातील रॉयल इनफिल्ड बुलेट मोटारसायकल बाबत कागदपत्राची मागणी करुन विचारपुस केली असता सदर इनफिल्ड बुलेट गाडी अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातून रात्रीदरम्यान चोरी केल्याचे सांगीतले. वरुन नमुद दोन्ही आरोपीतांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे ईतर साथीदार ३) प्रतिक उर्फ चिक्या दिपक माहुरे वय अं. २३ वर्ष, रा. रामनगर, चांदुर रेल्वे ता. चांदुर रेल्वे ४) गौरव उर्फ पनोती राजु पोहोकार रा. ओम भवन जवळ, नागपुर रोड चंद्रपुर यांचे मदतीने १९ मोटारसायकली चोरी करुन विक्री केल्याची कबुली दिली. वरुन मोटारसायकली जप्त केलेल्या ग्राहकांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी १) चेतन नरेंद्र चव्हाण वय २२ वर्ष, रा. सोनोरा भिलटेक ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती हा नागपुर येथील आरोपी नौशाद अली शौकत अली रा. टेकानाका नागपुर जि. नागपुर शहर याचेकडून बनावट आर. सी. बुक कागदपत्रे तयार करुन माझे नातेवाईक मरण पावले आहे. पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगुन मोटारसायकली काही लोकांना गहाण ठेवून तर काहींना ३० ते ३५ हजार रुपयांना विक्री केल्याचे असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपींनकडून अमरावती शहर येथील ५ मो.सा., अमरावती ग्रामीण १ मो.सा., नागपुर शहर ४ मो.सा., चंद्रपुर जिल्हयातील १ मो.सा. अशा एकुण ११ मोटारसायकली कि.अं. १०,०५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपींना पुढील तपासकामी पोस्टे नांदगाव खंडेश्वर येथील अपराध क्रमांक २७१ / २०२३ कलम ३७९ भादंवीचे गुन्हयात ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास सुरु असुन आरोपीतांनकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. शशिकांत सातव सा., पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम शेख गफुर श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम यादव, पो.हे.कॉ. मंगेश लकडे, पो.हे.कॉ. चंद्रशेखर खंडारे, ना.पो.कॉ. सचिन मसांगे, चालक पो.हे.कॉ. हर्षद घुसे, मंगेश मानमोठे व ना. पो. कॉ. सागर थापड सायबर सेल अमरावती ग्रा. यांनी केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: