Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | एका विकृत निवृत्त पोलिसाने केली अपंग महिलेला जीवघेणी मारहाण...व्हिडिओ पाहून...

अमरावती | एका विकृत निवृत्त पोलिसाने केली अपंग महिलेला जीवघेणी मारहाण…व्हिडिओ पाहून संताप येईल…

अमरावती जिल्ह्याची नवी ओळख म्हणजे गुन्हेगारीत विदर्भातील अव्वल जिल्हा म्हणून होत चालल्याचे दिसत आहे. या जिल्ह्याची संपुर्ण कमान महिलांची हाती असून सुद्धा या जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच अमरावती जिल्ह्यातील आष्टी इथं दारुच्या नशेत एका विकृत निवृत्त पोलीस कर्मचारी विजय दहातोंडे याने एका अपंग शेतकरी महिलेला पट्याने व काठीने जीवघेणी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

भातकुली तालुक्यातील आष्टी येथील शेत शिवारात ही घटना घडली. अपंग शेतकरी महिला वनिता संतोष इंगळे ही महिला शेतात सांडलेले सोयाबिन (सरवा )वेचण्याकरीता गेली होती. या दरम्यान वलगाव पोलीस स्टेशन येथील निवृत्त पोलीस कर्मचारी विजय दहातोंडे याने दारुच्या नशेत अपंग शेतकरी महिलेला पट्याने व काठीने जबर मारहाण केली. ही घटना 3 दिवसांपूर्वीची सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. पण पोलीस तक्रार केल्यास संपुर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर धाडस करून या महिलेनं तक्रार दिली आणि प्रकरणाचा वाचा फुटली.

महिलेच्या अंगावरील मारहाणीचे निशाण पाहून आरोपीच्या कृरतेची कल्पना येते. आरोपी विरुद्ध अपंग शेतकरी महीलेने वलगाव पोलिसांना तक्रार दाखल केली आहे. मात्र आरोपी निवृत्त पोलीस कर्मचारी असल्याने आरोपींला पोलिस कुठेतरी वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी विरुद्ध 324, 504, 506 नुसार वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यात अजूनही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नाही. आरोपीला अटक सुद्धा केली नाही. आरोपीविरुद्ध वलगाव पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप अपंग शेतकरी महिलेने केला आहे.

तर दुसरीकडे अपंगांचे स्वतंत्र मंत्रालय होणार असल्याने दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू भाऊ यांनी कालच अमरावती शहरात जल्लोष साजरा केला. मात्र या अपंग महिलेवर झालेला अत्याचार दिसला नाही का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

video सौजन्य सोशल मीडिया

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: