अमरावती शहरातील प्रभात टॉकीज जवळील असलेली जीर्ण झालेली दोन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या मलब्याखाली दबून चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १ वाजताच्या सुमारास घडली असून मलब्याखाली दबलेले चारही मृतदेह बाहेर काढल्याचे माहिती समोर येत असून चारही मजूर असल्याचे समजते. तर दोघे गंभीर
अमरावती शहरातील प्रभात टॉकीज जवळ असलेली जुनी इमारत राजेंद्र लॉज आज १ वाजताच्या दरम्यान अचानक कोसळल्याने इमारतीच्या मलब्याखाली 6 लोक दबल्याची माहिती मिळाली होती तर त्यातील सहाही ही लोकांना बाहेर काढले असून त्यातील चौघे मृतावस्थेत होत. तर दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.
राजेंद्र लॉजच्या मालकास महापालिकेने चार वर्षांपूर्वीच व्यावसायिक दुकाने असलेली ही इमारत अति शिकस्त झाली असल्याने इमारत पाडण्याचे निर्देश संबंधिताला दिले होते. त्यामुळे दोन तीन दिवसापासून ही इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. पाडकाम करीत असताना अचानक इमारतीचा पहिला माळा कोसळला. त्यामध्ये चार ते पाच मजूर दाबल्या गेले होते. त्यापैकी दोघांना ढिगाराखालून जिवंत काढण्यात आल्याचे समजते.
महापालिकेची यंत्रणा पोहोचण्यापूर्वी लोकांनी स्वतःच कुदळे फावडे घेऊन मदत कार्य अवलंबविले होते. महापालिकेची अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून सिटी कोतवालीच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला वेग देण्यात आला आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर घटनास्थळी दाखल.