अमरावती : मागील महिन्यात 26 जून रोजी शहरातील लालखाडी परिसरात मो.शाहरुख मो. रफीक या युवकाचा खून झाला होता आता या प्रकरणात आरोपी शेख समीर शेख मुश्ताक नावाचा आरोपी सध्या तुरुंगात असून या प्रकरणात आणखी दोन नावाची भर पडली असून आरोपीने दानिश शाह कलंदर शाह आणि शेख सलाम शेख सलीम यांच्या सांगण्यावरून मो.शाहरुख मो. रफीक चा खून केला असल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे शेख समीरसह या खून प्रकरणातील अन्य दोन आरोपींचीही नावे घेऊन त्यांना अटक करावी. यासंदर्भातील मागणीचे निवेदन शाहरुखचा भाऊ मो.एहफाज मोहम्मद रफिक यांनी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह शहर पोलिस आयुक्त आणि नागपूर गेट पोलिस ठाण्याचे एसएचओ यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी तिन्ही आरोपी एकत्र होते आणि याआधीही मो. शाहरुखसोबत अनेक भांडण झाले. ज्या अंतर्गत आरोपी मो. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच २६ जून रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास शेख समीर याला वनीश शहा व शेख सलाम यांनी भडकावून शाहरुखची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
या प्रकरणी आतापर्यंत केवळ शेख समीरला पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचीही नावे घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची गरज आहे. असे मृतकाचा भाऊ मो.एहफाज यांनी निवेदनात म्हटले आहे.