Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | ६० वर्षीय महिलेवर अत्याचार करून जिवानिशी संपविले...पथ्रोट येथील धक्कादायक घटना...

अमरावती | ६० वर्षीय महिलेवर अत्याचार करून जिवानिशी संपविले…पथ्रोट येथील धक्कादायक घटना…

अमरावती जिल्हा हा महिलांचं राज असलेला जिल्हा म्हणून जरी ओळख असली तरी मात्र या जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार व गुन्हेगारी घटना थांबायचं नावच घेत नाही. या जिल्ह्यात खाकीचा धाक संपला असल्याचे चित्र दिसत आहे. तर नुकताच एका ६० वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार पथ्रोट येथे घडला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अमरावतीच्या पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना आहे. या विचित्र घटनेमुळे महिलांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय. काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 60 वर्षीय महिला विशाल नंदोकर याच्या घरात मृतावस्थेत सापडल्याने मृतक महिला यांच्या भावाने तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये आपल्या बहिणी सोबत कुकर्म करून तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी पथ्रोट पोलिसांनी नराधम विशाल नांदुरकर यास बेळ्या ठोकल्या आहेत. आरोपी विशाल विरुद्ध अत्याचार आणि हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आलाय. सद्या पिडीतेच शववि्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. या संदर्भात पोलीस तपास करताहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: