Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती । २५ वर्षीय महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर केला अत्याचार...नराधम फरार...

अमरावती । २५ वर्षीय महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर केला अत्याचार…नराधम फरार…

अमरावती : जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना कमी व्हायचं नावच घेत नसून त्या सातत्याने सुरूच आहेत. काल एका 25 पंचवीस वर्षीय महिलेच्या हातपाय साडीने बांधून तिच्यावर जंगलात अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सदर घटना अमरावतीच्या चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी आरोपी हिरालाल जामुनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी हिरालालचा सध्या शोध घेत आहेत. महिला मजुरी कामासाठी घराबाहेर निघाली होती. दरम्यान आरोपी हिरालाल जामूनकर यांनी तिला रस्त्यात अडवले. तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने जंगलात नेले. तेथे महिलेच्या साडीने तिचे हातपाय बांधून जंगलातील झुडपात लपवले.

त्यानंतर सतत तीन दिवस रात्रीच्या वेळेस त्या महिलावर अत्याचार केला. या नराधमाच्या तावडीतून पीडित महिलेने कशीबशी सुटका केली. चिखलदरा पोलीस स्टेशन गाठून आपबीती सांगितली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: