अमरावती शहरातील बुधवारा परिसरात असलेल्या दिगंबर जैन मंदिरातून ७ ते ८ इंचाच्या ४ मुर्त्यासह पादुका चोरी झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडले असता चोरीची माहिती उघडकीस आल्याने खोलापुरी गेट सह शहर गुन्हे शाखा विशेष पोलीस पथक दाखल होऊन तपासणी करण्यात आली. मुख्य दरवाज्या बाजूने असलेल्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मुर्त्या चोरी केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी करण्यात आता पोलीस यंत्रणा कामी लागली आहे…
अमरावती शहरात चोरट्याने बुधवारा परिसरातील आझाद चौकात असलेल्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरालाच टार्गेट करून मंदिरातील भगवान महावीरांच्या मुर्त्या लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक वर्षां पूर्वी पासून निर्माण करण्यात आलेल्या या चंद्र्प्रभू दिगंबर जैन मंदिर येथे दररोज जैन समाज बांधव प्रार्थेनेला येत असतात. आज ११ डिसेम्बर ला सकाळी मंदिराचे गेट उघडले असता आत मंदिरात पाहणी केली तर देवपाटावर ठेवण्यात आलेल्या भगवान महावीरांच्या ७ ते ८ इंचाच्या मुर्त्या अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले. यासोबतच मंदिरातील पादुका सुद्धा चोरी झाल्याचे उघडकीस आले. अज्ञात चोरट्याने चोरट्याने तब्बल ४२ हजार ५०० रुपयाचा मूर्ती पादुका चोरी केल्याची तक्रार मंदिराचे देखभालकर्ते फिर्यादी प्रदीप देविदास मानेकर यांनी खोलापुरी गेट पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.
या चोरी प्रकरणात खोलापुरी गेट पोलीस निरीक्षक रमेश टाले यांनी आपल्या पथकासह मंदिर गाठून पाहणी केली. यासोबतच शहर गुन्हे शाखा पोलीस पथक विशेष पोलीस पथक सुद्धा दाखल होऊन मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी करण्यात आली. घटनास्थळी फिंगर प्रिंट एक्स्पर्ट टीम ला सुद्धा पाचारण करण्यात आले. अज्ञात चोरट्याने मंदिरातील भगवान महावीरांच्या मुर्त्या चोरी केल्याने अनेक जैन समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. या घटनेत चोरट्यांचा तात्काळ तपास लावण्यात यावा अशी मागणी आता सर्व जैन समाज बांधवाकडून होताना दिसून येत आहे.