Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती । अपहरणकर्ता नईम खानच्या हत्ये प्रकरणी ४ जणांना अटक...

अमरावती । अपहरणकर्ता नईम खानच्या हत्ये प्रकरणी ४ जणांना अटक…

अमरावती : चांदुर रेल्वे शहरातील कुख्यात गुंड व मुलीचे अपहरणकर्ता नईम खान याची हत्या कोणी केली असा प्रश्न पडला असतांना अमरावती पोलिसांनी या हत्येचा उलगडा अवघ्या 6 तासात लावला आणि चार आरोपींना गजाआड केले.आज शनिवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

चांदुर रेल्वे येथील कुख्यात गुंड नईम खान रहमान खान याची निर्घृण हत्या करण्यात आली होती त्याच्या शरीरावर चाकूचे असंख्य वार असल्याचे पोलीस पंचनाम्यात पुढे आले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक २३.०९.२०२२ रोजी पो.स्टे. चांदुर रेल्वे येथे नईम खान रहेमान खान याची चांदुर रेल्वे येथे झालेल्या हत्येवरून पोस्टे चांदुर रेल्वे येथे अप. क. ४९९ / २२ कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक व पोलिस स्टेशन, चांदुर रेल्वे येथील पथकाव्दारे तपासादरम्यान दि. २१.०९.२०२२ रोजी मृतक नईम खान रहेमान खान याने त्याचे काही साथीदारांसह गारूडी मोहल्ला, चांदुर रेल्वे येथील एका अल्पवयीन मुलीच जबरदस्तीने अपहरण केले होते. यावरून पोस्टे चांदुर रेल्वे येथे आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात येवुन पिडीता व आरोपी याचा शोध सुरू होता.

दि. २३.०९.२०२२ चे सकाळी ०१.३० वा. चे दरम्यान आरोपी हा आपले साथीदारासह चांदुर रेल्वे येथे येवुन त्याने पिडीता हिस आपले घराजवळ सोडुन दिले. त्यादरम्यान या मोहल्लामध्ये हजर असलेले मो. आशिक अब्दुल कादर, वय ४२ वय २६ वर्षे, रा. चांदुर रेल्वे , अफजल खा युसुफ खा मदारी, वय २७ वर्षे, रा. चांदुर रेल्वे , साजीद उमर उर्फ पप्पु फारूख शेख, वय ४१ वर्षे, रा. चांदुर रेल्वे, दीपक रतन पवार, वय २८ वर्षे, रा. चांदुर रेल्वे यांचे सोबत नईम खान रहेमान खान यांनी वाद करून आरोपीनी नईम खान रहेमान खान यास जिवानीशी ठार मारले,

अशा मिळालेल्या माहितीवरून सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हा संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केलेबाबत कबुली दिली. यानंतर आरोपीतांना पुढील कारवाई कामी पो.स्टे. चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) व पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक तस्लिम शेख, पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर व त्यांचे पथकातील अंमलदार तसेच पोस्टे चांदुर रेल्वे येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, मनोज सुरवाडे, सहायक पोलिस निरीक्षक गिता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी केली. सायबर सेलची तपासात मदत झाली.

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज शनिवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: