अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिस स्टेशन अंतर्गत 8 किलोमीटर अंतरावरील कळमखार येथील रहिवाशी मधू रामू गायकवाड वय 35 वर्ष या इसमाने आपल्या राहत्या घरात विहीर ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीन कांड्याचा ब्लास्ट करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातुन टोकाचे पाउल उचलले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी धारणी पोलीस दाखल झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून धारणी तालुक्यातील कळमखार गावातील महिलेशी लग्न करून तेथेच सासऱ्याच्या शेजारी घरजवाई म्हणून मागील दहा वर्षापासून रामू मधु गायकवाड वय 35 वर्ष व त्याची पत्नी व दोन मुले राहत होते त्या दोघामध्ये घरगुती कारणावरून दोन दिवसापासून वाद सुरू होता त्या वादातून त्याने त्याच्या पत्नीला व मुलाना घरातून दोन दिवसांपासून हाकलून दिले होते तरीसुद्धा त्याची पत्नी मंगळवारी सकाळी सहा वाजता त्याच्या घरी गेली होती तेव्हा पण पुन्हा त्याने तिला हाकलून दिले व त्याच दरम्यान त्याने मासेमारी करण्याकरिता वापरण्यात येणारे घरात असलेले जिलेटिन स्वतःच्या गळ्याला गुंडाळून घेतले व त्याच्या वायरला मोबाईलच्या बॅटरीचा करंट देऊन ते स्वतःच्या अंगावर फोडून आत्महत्या केली त्या जिलेटीन च्या स्फोटाने रामू च्या शरीराचे चिथळे चिथळे उडाले दोघांच्या वादामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासा वरून व्यक्त केला जात आहे
घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आल्याने धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग महापुरे, प्रमोद बाळापुरे. धर्माडे. त्यांनी पंचनामा करुन मधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धारणी येथे पाठविले.