अमरावती | जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भिवापूर धरणावर आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अक्षय नसकरी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो दोन मित्रासोबत धरणावर फिरायला आला होता मात्र आंघोळीचा मोह आवरला नसल्याने तिघेही पाण्यात उतरले मात्र त्या दोन मित्रांना खोल पाण्याचा अंदाज आल्याने ते परत आले. मात्र अक्षय पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज सायंकाळी 5.30 वाजताची घटना घडली असून घटनेची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली असता जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 समादेशक श्री राकेश कलासागर साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर साहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक घटनास्थळी दिनांक 04/07/2024 रोजी सायंकाळी 06.20 सुमारास घटनास्थळी पोहोचून अक्षयचा मृतदेहाचे शोधकार्य सुरु केले.
यावेळी रेस्क्यू टीमनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी गळ व हुक च्या साह्याने शोधकार्यला सुरुवात केली. सायंकाळी 7.00 सुमारास अक्षयचा मृतदेह हाती लागला. अक्षयचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करीता पोलिसांच्या हवाली केला.शोधकार्य पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.