Saturday, September 21, 2024
Homeराज्यअमोल खडोतकर अध्यक्ष, चौधरी उपाध्यक्ष तर बीरणवार महासचिव पदी नियुक्त...

अमोल खडोतकर अध्यक्ष, चौधरी उपाध्यक्ष तर बीरणवार महासचिव पदी नियुक्त…

रामटेक तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी घोषित…

रामटेक – राजू कापसे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रामटेक तालुका कार्यकारिणीला दोन वर्ष पूर्ण होताच नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नागार्जून येथील टुरिस्ट होटल येथे शुक्रवारला संपन्न सभेत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल खडोतकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी पंकज चौधरी व महासचिव पदी रितेश बीरणवार यांना एकमताने निवडण्यात आहे. निवर्तमान अध्यक्ष अनिल वाघमारे हे मार्गदर्शक म्हणुन राहतील.याचप्रमाणे खालील कार्यकारिणी पदाधिकारी घोषीत करण्यात आले.

यात अजय मेहरकुळे (सचिव),हर्षपाल मेश्राम (सहसचिव), आकाश सहारे (कोषाध्यक्ष), विमल त्रिपाठी (जिला प्रतिनिधि) तसेच सदस्य म्हणुन देव धुर्वे, शुभम बावनकुले,सुनील कोल्हे,आकाश वानखेडे,दिनेश काडेकर सामिल आहेत. सभेत संघाचे नवीन नियम,हिशोब,पुढील कार्यक्रम,उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.यावेळी डा.राजेश ठाकरे आमंत्रक म्हणुन विशेषत्वाने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: