Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनAmeen Sayani | आवाजाचा जादूगार अमीन सयानी याचं वयाच्या ९१ व्या वर्षी...

Ameen Sayani | आवाजाचा जादूगार अमीन सयानी याचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन…

Ameen Sayani : ‘नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमचा मित्र अमीन सयानी आहे’ आता हा परिचय पुन्हा ऐकायला मिळणार नाही. आपल्या जादुई आवाजाने आणि मस्त शैलीने जगातील अनेक देशांतील श्रोत्यांच्या हृदयावर वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या सयानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेडिओच्या दुनियेत आवाजाचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज व्यक्तीच्या निधनाला त्यांचा मुलगा रझील सयानी याने दुजोरा दिला आहे.

बिनाका गीत माला मधून ओळख मिळाली
अमीन सयानी हे देशातील पहिले रेडिओ स्टार होते, ज्यांचा मोठ्या सिनेतारकांनीही आदर करायचे. एक काळ असा होता की या आवाजाच्या बादशहाने आपल्या ‘बिनाका गीत माला’ या कार्यक्रमातून आपले नाव लौकिक केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सयानी यांची प्रकृती ठीक नव्हती.

अमीन सयानी यांचा मुलगा रझील सयानी याला त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सांगितले की सयानी यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

1932 मध्ये जन्म झाला
अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला होता. अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात मोठे नाव कमावले. त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनात घर करून गेली. अमीन सयानी यांनी आपल्या कारकिर्दीला ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथून रेडिओ प्रस्तुतकर्ता म्हणून सुरुवात केली. त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी त्यांची येथे ओळख करून दिली होती. 10 वर्षे त्यांनी इंग्रजी कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्यांनी भारतात आकाशवाणीला लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: