Sunday, December 22, 2024
HomeUncategorizedटायगर ग्रुप द्वारे ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत...

टायगर ग्रुप द्वारे ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत…

अहेरी – मिलिंद खोंड

गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल, आरोग्या च्या सुविधांची कमी असे ओळखाला जातो त्याच जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातात होणारे वाढ,गर्भवती महिलांना रुग्णवाहिके अभावी वेळेत न मिळणारे उपचार,नवजात शिशुंसाठी ऑक्सिजन नसलेले रुग्णवाहिका,रक्ताची तुटवडा,होणारे गौहत्या ह्या सगळ्या होणाऱ्या घटनेचे विचार करून महाराष्ट्र व टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ,तानाजी जाधव यांच्या मार्गदरशनाखाली २०१६ मध्ये टायगर ग्रुप आलापल्ली सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली.

ग्रामीण भागात कुठे ही अपघात झाल्यास तत्काळ घटना स्थळी पोहचून दुचाकी ने रुग्णालयापर्यंत पोहचवण्यात येत होते.
जिल्ह्यात रुग्णवाहिका वेळेस पोहचत नसल्या मुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागत आहे म्हणून सर्व सदस्यांनी मिळून एक रुग्णवाहिका खरेदी करण्याचा विचार केले मात्र सर्व सदस्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली त्यातूनच काही महिन्यानंतर एक जुनी ओमनी रुग्णवाहिका ३५ हजार रुपयात खरेदी करून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी मोफत मध्ये उपलब्ध करून दिले कोणत्याही राजकीय किव्हा व्यापारी कडून वर्गणी न घेता स्वखर्चाने पेट्रोल टाकून त्याच जुन्या रुग्णवाहिकेने १००० रुग्णांना यशस्वीपणे मोफत मदत मिळाले.

टायगर ग्रुप सामाजिक संस्थेचा नाव जिल्हाभर पसरला ठीक ठिकाणी शाखे स्थापन झाले आज संपूर्ण जिल्ह्यात टायगर ग्रुपचे सदस्य आहेत. ग्रामीण भागात कोणाच्याही मृत्य झाल्यास नातेवाईक बाहेर गावून येत पर्यंत ओले पान व कपड्याने बांधून १-२ दिवस शव ठेवयाचे मग हे सर्व बघून ग्रुपच्या सदस्यांना शवपेटीची गरज पडली.

सर्व सदस्यांनी मिळून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजेअम्ब्रिशराव आत्राम यांना शवपेटी खरेदी करून देण्याची मागणी केली असता राजेंनी टायगर ग्रुपचे सामाजिक कार्याची प्रशंसा करत १ आठवड्यात वातानुकूलित शवपेटी खरेदी करून दिले कोणतीही अडचण असल्यास मला कळवा असे आश्वासन पण दिले कोणाच्याही सुख – दुःखात सहभागी व्हावे यासाठी टायगर ग्रुप चे सदस्य नेहमी धडपड करतात.

मृत अनाथांना खंदा देऊन त्यांच्या रीतिरिवाजाने अंतिम संस्कार करत आहेत, ग्रुपच्या सदस्यांना जेवढं प्रेम गरीब लोकांनवर आहे तेवढाच प्रेम पशू-प्राण्यांवर आहे. याच प्रकारे कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ ट्रक गायींना जीवनदान दिले व जखमी असलेल्या प्राण्यांचा उपचार देखील करत असतात अशेच अनेक काम टायगर ग्रुप तर्फे केले जातात.

२७ जून २०२३ ला गर्भवती ,नवजात शिशुंसाठी टायगर ग्रुप तर्फे स्वखर्चाने ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिका चे लोकार्पण करण्यात आले आता अहेरी ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी गडचिरोली व चंद्रपूर हलविण्यात येणाऱ्या रुग्णांना या रुग्णवाहिकाद्वारा नक्कीच मदत होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: