नरखेड कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे अंबिया बहार संत्रा खरेदीचा शुभारंभ दिनांक 18/10/2022 रोज मंगळवारला संत्रा बाजार आवार नरखेड येथे झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती पंचायत समिती नरखेड , तथा शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख, श्री. राजेंद्रजी हरणे, पंचायत समिती नरखेड सभापती श्री. महेंद्रजी गजबे, माजी पंचायत समिती सभापती सौ. नीलिमाताई रेवतकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुरेशरावजी आरघोडे, उपसभापती श्री. चंद्रशेखरजी मदणकर,
संचालक दिनेश्वरजी राऊत, जानरावजी ढोकणे श्री. रमेशपंथजी शेटे, श्री. घनशामजी फुले, श्री. अशोकरावजी राऊत, श्री. अरुणरावजी वंजारी, संचालक तथा व्यापारी श्री. मुशीर शेख यांच्या प्रमुख उपस्तिथ करण्यात आला यावेळी मंडीत पहिल्या दिवशी सुमारे 300 गाड्यांची आवक होती.
55 शेतकऱ्यांनी आपलेकडे संत्रा मोसंबी कृषिमाल विक्रीकरिता आणला. शुभारंभाच्या दिवशी संत्र्याला 20000 ते 25000 रुपये प्रती टन विक्रमी भाव मिळाला यावेळी बाजार समितीचे अडते व्यापारी श्री. ललन प्रसाद साह, श्री. विलायतीलाल सहगल, श्री. दीपक खत्री, श्री ओमप्रकाश मैनानी श्री. रामरावजी सोमकुवर,
श्री. अशपाक पठाण, श्री. हादी काजी, श्री. शेख सादिक, श्री. मुस्थाक पठाण, श्री. विनोदरावजी भिसे, बाजार समितीचे सचिव श्री. सतिश येवले, कोषपाल श्री. राधेशाम मोहरिया, श्री. सुनील कडू, श्री. अमोल ठाकरे बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी आदी उपस्तिथ होते..