बिलोली – रत्नाकर जाधव
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सध्या घटनेच्या संदर्भात चर्चा चालू असून या चर्चेत राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी बिलोलीत आंबेडकरवादी संघटनाकडून निषेध करण्यात आला आहे.
संसदेचे हुवाली अधिवेशन चालू असून या अधिवेशनात देशाचे गृहमंत्री विरोधकांच्या प्रश्ननाला उत्तर देत असतांना विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर घटनाचा अनादर होत असून भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून घटनेच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत “आंबेडकर आंबेडकर आंबेडकर जप करण्यापेक्षा देवाचा जप केला तर स्वार्गात जगा भेटेल ” असे वक्तव्य करून बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमान जनक वक्तव्य केले.
त्यामुळे आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. ज्या महामानवानी भारत एकसंघ राहावा म्हणून एक आदर्श घटना भारताला दिली. ज्या घटनेचा आदर्श पश्चात देश करतात.
जगातील नंबर एक ऑक्सपर्ड विद्यापीठाणे “सिमबॉल ऑफ नॉलेज इन दी वर्ल्ड ” अशी उपाधी दिली त्या महामानवाबद्दल देशाच्या सर्वश्रेष्ठ सभागृहात अवमान केला त्याच्या निषेधार्थ आहे दि.१९ डिसेंबर रोजी बिलोली तालुक्यातील आंबेडकरवादी समाजाने व संघटनानी नरसी डिचपल्ली महामार्गांवर निषेध करत तहसीलदारांना निवेदन दिले.
यावेळी आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीयमंत्री अमितशहा यांच्याविरुद्ध घोषणा देऊन त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. यावेळी तालुक्यातील अनेकांची उपस्थिती होती