मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या मतदारसंघात यावेळेस अनेक अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक मैदानात उतरले आहेत. प्रत्येक उमेदवाराला आपणच निवडून येणार असल्याची खात्री आहे. अश्यातच गेल्या दोन तीन वर्षांपासून एका संधी साधू उमेदवाराने या मतदार संघात पैशाचा महापूर आणून लोकांना पैशाचे आमिष देत आंबेडकरी जनतेला व तसेच इतरही समाजातील काही लोकांना जवळ केले होते. मात्र त्या उमेदवाराचा खरा चेहरा जसा जनतेने ओळखला आणि त्याला दूर करणे सुरु केले तर आता त्याची अवस्था घर का ना घाट का झाली आहे. कारण ज्या समाज्याच्या भरवश्यावर त्याला तिकीट मिळाली होती आता तोच समाज आता पुन्हा वंचित कडे गेल्याने आता या उमेदवाराचे डीपाझीट वाचणार नसल्याचे येथील मतदार सांगतात.
राजकारणातील एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा, मोठा उद्योजक, समाजसेवेचा वारसा जपणारा, डॉ. सुगत वाघमारे हे आता आंबेडकरी जनतेच्या मनातील नेते होऊ लागल्याने आता पूर्ण समाज (काही लालची लोक सोडून) हा बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाच्या ठामपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला आंबेडकरी जनता दोन भागात विभागल्या जाणार असे चित्रही निर्माण झाले होते. मात्र ज्या उमेदवाराच्या मागे समाज जात होता तेव्हा त्याची हकीकत जेव्हा लोकांना कळली तेव्हा त्याच्या भूलथापांना बळी पडलेला समाज आता पूर्णतः डॉक्टर सुगत वाघमारेच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे. निवडणुकीपूर्वी या संधीसाधू उमेदवाराने निवडणुकीपूर्वी लोकांना आमिषे दाखवले गेली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्या गरिबांना मदत करण्याची वेळ आली तेव्हा हा उमेदवार गायब झाला तेव्हा त्याचा खरा चेहरा ओळखू आला.
आपणच निवडून येऊ शकतो अशी लोकांच्या पुढे प्रतिभा उभी करून लोकांना आंबेडकरी जनतेला काही प्रमाणात आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा जो संधी साधूपणा लोकांच्या समोर आल्यामुळे आता लोकांनी हळूहळू डॉक्टर सुगत वाघमारे यांच्याकडे पाठिंबा दर्शविला असल्याचं सध्या मतदारसंघात चित्र आहे. तर डॉक्टर वाघमारे हे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याने या मतदारसंघातील बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा बराच वर्ग आहे. तर तो वर्ग आता डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे त्यामुळे जो संधी साधू उमेदवाराला आता या समाजाकडून काहीच मतदान मिळणार नसल्याचे समजते. हा इतर समाजांना सांगतो की आंबेडकरी समाज 40 टक्के माझ्याकडे आहे. त्यामुळे मीच निवडून येऊ शकतो अशी लोकांमध्ये प्रचार करून अनेक गोरगरिबांना पैशाचे आम्हीच दाखवून त्यांना मीच तुमचा मसीहा असल्याचे दाखवले होते. मात्र आता येथील आंबेडकरी जनता डॉक्टर सोबत वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे राहणार असल्याचे येथील जनता सांगत आहे.