Tuesday, September 17, 2024
Homeराज्यअंबाझरी पोलीसांनी बुडणाऱ्या मुलीला तत्परतेने वाचवून दिले जीवदान…

अंबाझरी पोलीसांनी बुडणाऱ्या मुलीला तत्परतेने वाचवून दिले जीवदान…

नागपूर – शरद नागदेवे

पोलिस ठाणे अंबाझरी येथील फुटाळा तलाव येथे आज दिनांक 16/08/2024 रोजी दुपारी 13.15 वाजताचे सुमारास मुलगी नावे गायत्री सुभाष सुपटकर वय 18 वर्ष राहणार न्यू नरसाळा ,कृष्णनगरी च्या बाजूला, नागपूर ही राहते घरी वाद झाल्यामुळे रागाचे भरात येऊन फुटाळा तलाव येथे उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असता पेट्रोलिंग वरील बीट मार्शल Pc/6392 राजेंद्र सोमकुवर , PN/7073 विनोद सानप यांनी तात्काळ तेथे उपस्थित पोहणारा मुलगा नामे कुणाल राकेश चौधरी वय २० वर्ष राहणार हजारी पहाड, गिट्टीखदान यांनी तात्काळ उडी मारून सदरच्या मुलीस सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले,

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गोल्हे यांना देऊन मुलीचे वडील नावे सुभाष सुपटकर वय 48 वर्षे यांना देऊन त्यांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांचे व मुलीचे सांत्वन करून समुपदेशन करून पुन्हा अशाप्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न न करण्याबाबत ताकीद देऊन घरी सोडण्यात आले, जीव वाचवणारा मुलगा नामे राकेश चौधरी व बीटमार्शल यांना पोलीस ठाणे येथे बोलावुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक करून सत्कार केला,

अशाप्रकारे अंबाझरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल यांनी अत्यंत सतर्कतेने तात्काळ दखल घेऊन एका बुडणाऱ्या मुलीला स्थानिकांच्या मदतीने जीवदान देण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यावेळी वनकर्मचाऱ्यांचे अध्यक्ष श्री अजय पाटील हे सुद्धा उपस्थित राहून त्यांनी सुद्धा जीवदान देणाऱ्या मुलाचे कौतुक केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: