रामटेक – राजू कापसे
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी २१ आगस्ट २०२३ रोजी सकाळी पूजा-अर्चना करून बर्फानी बाबा अमरनाथ चे कपाट उघडल्या जाईल व यज्ञ हवन तसेच दिवसभर विभिन्न भजन मंडळ द्वारे भजन किर्तनाचा कार्यक्रम होईल. भक्तगण बाबा अमरनाथची गुफा व बाबा अमरनाथ चे बर्फाचे शिवलिंग चे दर्शन महाशिवरात्री पर्यंत घेऊ शकेल.
वर्षापासून भारतातील धर्मप्रिय जनतेला बाबा अमरनाथच्या यात्रेचे विशेष आकर्षण राहिलेले आहे. प्राकृतिक व मानव निर्मित विपत्तींना सामोरे जाऊन देखील श्रद्धालु बाबा अमरनाथची यात्रा करित आहे. जो धर्मप्रिय भक्त बाबा अमरनाथच्या यात्रेस काही कारणास्तव जाऊ शकत नाही.
त्यांच्या मनात मुर्त स्वरूपात अशी इच्छा निर्माण होते की, यदाकदाचित येथेच जवळपास बाबा अमरनाथ चे दर्शन झाले तर, त्यांच्या मनुष्य जीवनाचे सार्थक होईल. असंख्य भक्तांच्या हया इच्छेच्या पूर्ततेकरिता ‘चन्द्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान’ तर्फे ‘रामधाम तीर्थ मनसर – रामटेक येथे महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये अमरनाथ धाम चे पवित्र कपाट उघडल्या गेले.
भक्तगण भगवान भोलेनाथच्या बर्फानी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर धन्य-धन्य होऊन, धर्म-भावनेत ओतप्रोत होत आहे. बाबा अमरनाथची गुफा व बाबा चे बर्फानी शिवलिंगाची दिव्य अनुभूति अनेक भाविकांना होते. ‘रामधाम’ येथे भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, द्वादस ज्योतिर्लिंग, अष्ट विनायक, माता वैष्णो देवी आणि विश्व प्रसिद्ध ‘ओम’ चे दर्शनासोबतच भगवान राम आणि भगवान कृष्ण च्या जीवनावरील चरित्र झांकी देखील पहायला मिळेल.
‘रामधाम’ नंतर सर्व प्रथम ‘शंकर ची बारात’ लाईट आणि शो नी भक्तगणांचे स्वागत होते. यानंतर प्रवेश होतो एक छोटयाशा गुफेमध्ये, जिथे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत श्रीकृष्णाचे गऊ प्रेम, गोवर्धन पर्वत, विष्णु लोक, विराट दर्शन असे अनेक दृश्य बघायला मिळते.
गुफेच्या शेवटी संग्रहालय असून तिथे भारताच्या विभिन्न भागातून संग्रहीत केलेले विविध प्रकारचे दगड ठेवण्यात आले आहेत. यानंतर राजस्थान व इतर भागातून आणलेल्या कलावंताचे समुह नृत्य, जादुचे खेळ बघून मन प्रसन्न होते. भारतीय संस्कृति आणि संस्कार चे दर्शन “रामधाम प्रकल्पात संपूर्ण प्रकारे होते.
‘रामधाम’ चे आजुबाजुने नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक, आल्हाददायक व नयनरम्य दृश्यनी अद्भूत सौंदर्यानी अंथरलेले आहे व या ठिकाणी भक्तांना स्वर्गीय पवित्रतेचा दिव्य आभास होत असतो.