Saturday, November 16, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | घरफोडी, दुकानफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना केले जेरबंद...स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची...

अमरावती | घरफोडी, दुकानफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना केले जेरबंद…स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची कारवाई…

अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे उपविभागातील धामणगाव रेल्वे शहरात घरफोडी, दुकान फोडी व मोटारसायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणने जेरबंद केले आहे. त्यांच्यावर घरफोडीचे एकुण ४ गुन्हे, मोटर सायकल चोरीचा एकुण ०९ गुन्हे व दुकान फोडीचा १ एकुण ६ गुन्हे उघड, २,८८,२३२/- रु चा मुदेमाल जप्त केला आहे.१. प्रविण गणेशराव राउत वय ३६ वर्ष, रा. हिवरा कावरे ता. देवळी जि. वर्धा २ अतुल राजु चांदेकर वय ३२ वर्ष, असे गुन्हेगारांची नावे आहेत.

मा. श्री. अविनाश बारगळ, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. यांनी जिल्हयात घरफोडी व मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना आळा बसावा याकरीता जिल्हातील व जिल्हयाबाहेरील घरफोडी व मोटर सायकल चोर यांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने दिनांक ०३/ ०३ / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे मोहम्मद तस्लीम व त्यांचे पथक घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हेगारांची माहीती घेत असता गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, पोलीस स्टेशन दत्तापुर हद्दीतील श्रीविहार कॉलनी, न्यु राठी नगर, धामणगाव रेल्वे येथील चोरी गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल ही आठवडी बाजार यवतमाळ येथील प्रविण राउत याने त्याचे साथीदारासह चोरली असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून १. प्रविण गणेशराव राउत वय ३६ वर्ष, रा. हिवरा कावरे ता. देवळी जि. वर्धा २ अतुल राजु चांदेकर वय ३२ वर्ष,

रा. आठवडी बाजार, यवतमाळ यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारणा केली असता त्याने त्याचा फरार साथीदारासह धामणगाव रेल्वे येथील मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून तसेच धामणगाव रेल्वे येथील न्यु राठी नगर, खेतान नगर, वेद विहार, लक्ष्मी नगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली देवून घरफोडीचे एकूण ४ गुन्हे व दुकानफोडीचा १ गुन्हा, मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ६ गुन्हे केल्याचे सांगीतले. वरुन आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील सोन्याचे दागीनेसह एकुण २,८८,२३२/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नमुद मुददेमाल व आरोपी यांना पुढील कायदेशिर कार्यवाही करीता पो स्टे दत्तापुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडून पोलीस स्टेशन दत्तापुर येथील अभिलेखावरील १) अपराध क्रमांक १६८ / २०२३ कलम ३७९ भादंवी २) अपराध क्रमांक ४१ / २०२३ कलम ४६१, ३८० भादंवी ३) अपराध क्रमांक ८६ / २०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवी ४ ) अपराध क्रमांक १२२/२०२३ कलम ४५७,३८० भादंवी

५) अपराध क्रमांक १२४ / २०२३ कलम ४५४, ४५७,३८० भादंवी ६) अपराध क्रमांक १५४/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवी चे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यवतमाळ, वर्धा, अकोला येथे खुन घरफोडी, जबरी चोरी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. नमुद आरोपीतांकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून आरोपीतांनी अमरावती शहर, यवतमाळ मध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदरची कारवाई मा पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. नितीन चुलपार, पोलीस उप निरीक्षक मोहम्मद तस्लीम शेख गफुर श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, ना.पो.कॉ. मंगेश लकडे, ना. पो. कॉ. चंद्रशेखर खंडारे, ना.पो.कॉ. सचिन मसांगे, चालक ना. पो. कॉ. हर्षद घुसे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: