Monday, December 23, 2024
Homeराज्यकिट्स मध्ये माजी विद्यार्थ्यांचे सम्मेलनविविध देशांतील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...

किट्स मध्ये माजी विद्यार्थ्यांचे सम्मेलनविविध देशांतील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला…

रामटेक – राजू कापसे

कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स) रामटेकच्या वतीने 21 डिसेंबर 2024 रोजी सिल्व्हर ज्युबिली हॉलमध्ये 1995-1999 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे सम्मेलन आयोजन करण्यात आले. सम्मेलन मधे विविध देशांतील 150 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमधे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. मंगेश जैस्वाल, माजी विद्यार्थी प्रतिनिधी प्राजक्ता कासलीकर (लोटे), सुमंतकुमार भंडारू, सर्व विभागप्रमुख, डीन, माजी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने किट्स ला जगात नावलौकिक मिळवून दिला आहे. किट्सच्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा.

अमेरिका, न्यू जर्सी, मनामा, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, दुबई, बहारीन आणि भारताच्या विविध भागातील माजी विद्यार्थ्यांनी मनोगत मधे म्हणाले की किट्स कॉलेजच्या उत्कृष्ट शिक्षण आणि शिस्तीमुळेच चांगल्या संस्थेत काम करत असल्याचे मत व्यक्त केले. किट्स बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की 1999 मधुन उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये आल्याने 25 वर्षांपूर्वीच्या आठवणी जिवंत झाल्या आणि जुन्या मित्रांना भेटून खूप आनंद झाला.

सकाळच्या सत्रात, माजी विद्यार्थ्यांनी किट्स कॅम्पसला भेट दिली आणि समाधान व्यक्त केले. ग्रुपसोबत फोटो काढला आणि विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी संवादही साधला.

दुपारच्या सत्रात त्यांनी आपल्या दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम सोमाणी व कीट्सच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्य यानी प्रयत्न केले.
प्रास्ताविक प्रा. मंगेश जैस्वाल यांनी केले. संचालन प्रा. हर्षिता जैन तर आभार प्रा. शीतल काठीकर यांनी मानले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: