अमोल साबळे – अकोला
गेल्या महिनाभरापासून अकोल्यासह राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम राज्यभरातील वीजनिर्मिती करणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पांवर झाला आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत झाल्यामुळे महावितरणच्या अकोला येते. परिमंडळात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आपात्कालीन भारनियमनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अकोलेकरांना आता उन्हाच्या चटक्यांसोबतच भारनियमनाचेही चटके सहन आहेत. करावे लागत
पावसाने दडी मारल्यामुळे कृषिपंपांचा वापर वाढला आहे, तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने येत आहे. घरगुती वीज वापरही वाढला आहे. परिणामी संपूर्ण राज्यात विजेची मागणी वाढली आहे. सध्या राज्याची विजेची मागणी २२ ते २३ हजार मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. अशातच कोराडी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच बंद असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.
त्यामुळे राज्यात जवळपास १५०० मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली आहे. राज्यातील सात ठिकाणच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त महावितरण काही खासगी