नांदेड – महेंद्र गायकवाड
समाजातील सर्व घटकातील व्यक्तीनी व्यसना पासून दूर राहिल्यास येणारी पिढी निर्व्यसनी बनेल असे प्रतिपादन नांदेड भूषण बाबा बलविंदरसिंघ यांनी शहरातील तरोडा (खु)भागात मालेगाव रोड स्थित नवजीवन व्यसनमुक्ती उपचार केंद्राच्या उदघाटन प्रसंगी केले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस अनु.जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम हे उपस्थित होते.
तरोडा (खु) भागातील मालेगाव रोड स्थित शिवशक्ती कॉम्प्लेक्स येथे नवजीवन व्यसनमुक्ती उपचार केंद्राची नव्यानेच सुरवात करण्यात आली असून या व्यसनमुक्ती केंद्राचे उदघाटन मंगळवारी नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बाबा बलविंदरसिंघ यांनी व्यसनमुक्तीचे काम हे फार पुण्याचे काम असल्याचे म्हण्टले आहे.
मंगेश कदम यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कदम यांनी व्यसनी व्यक्तीची मनातून दारू सोडण्याची इच्छा व कुटुंबाप्रति आपल्या जबाबदारीची जाणीव असल्यास या व्यसन मुक्ती केंद्रात येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन यावेळी केले.या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,देविदास क्षीरसागर, समुपदेशक अर्जुन काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.